*मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या स्वप्नपूर्तीसाठी शिक्षक परिषदेने काम करावे*

6

*मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या स्वप्नपूर्तीसाठी शिक्षक परिषदेने काम करावे*

 

*माजी आमदार डॉक्टर देवरावजी होळी*

 

*चपराळा येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद गडचिरोली 31 वे गडचिरोली जिल्हा अधिवेशन उत्साहात*

 

*दिनांक 2 फेब्रुवारी चपराळा*

 

*2047 पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न उराशी बाळगून मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी अहोरात्र काम करीत आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नेहमीच समाज व देशहिताच्या दृष्टीने काम करणारी संघटना असून त्यांनी मा. मोदीजी यांच्या स्वप्नपूर्तीसाठी काम करावे असे आवाहन माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष डॉक्टर देवरावजी होळी यांनी प्रशांत धाम चपराळा येथे आयोजित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या 31 व्या गडचिरोली जिल्हा अधिवेशनाच्या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना केले. याप्रसंगी मंचावर माजी आमदार नागो गाणार, पुजाताई चौधरी, नंदकिशोर ओल्लालवार, संतोष सुरावार, अजय वानखेडे, सुभाष गोतमारे, घनश्याम मनबत्तुवार, मृणाल तुम्पल्लीवर, तसेच शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते*

 

*महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे गडचिरोली जिल्ह्यातील अनुदानित, विना अनुदानित कायम विना अनुदानित प्राथमिक, माध्यमिक उच्च माध्यमिक, शाळा, समाज कल्याण अंतर्गत येणाऱ्या खाजगी आश्रम शाळा, प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या आदीवासी खाजगी आश्रम शाळा 31 वे संयुक्त जिल्हा अधिवेशन व शिक्षण दरबार श्रीहनुमान मंदिर प्रशांतधाम परिसर चपराळा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे.*