*टिसीओसी कालावधीच्या सुरुवातीलाच 4 जहाल माओवाद्यांनी केले गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ समोर आत्मसमर्पण*
*गडचिरोली*
* शासनाने जाहिर केले होते एकुण 28 लाख रूपयांचे बक्षिस.
* एक डीव्हीसीएम (Divisional committee member) दर्जाच्या वरीष्ठ कॅडरसह, एक एसीएम (Area Committee Member) व दोन सदस्य पदावरील माओवाद्यांनी केले आत्मसमर्पण
* दोन पती-पत्नी जोडप्यांनी आत्मसमर्पण करुन स्वीकारला सन्मानाने जीवन जगण्याचा मार्ग
शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 695 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. आज दिनांक 03 फेब्रुवारी 2025 रोजी 01 डी.व्हि.सी.एम., 01 ए.सी.एम. दर्जाच्या वरिष्ठ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते आतापर्यंत एकुण 50 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. तसेच सन 2025 साली आतापर्यंत एकुण 17 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलेले आहे.