*प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करा* – खासदार डॉ नामदेव किरसान यांची संसदेत मागणी

4

*प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करा* – खासदार डॉ नामदेव किरसान यांची संसदेत मागणी

 

गडचिरोली :: केंद्र सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दिल्ली येथे सुरु असून, राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील चर्चेत गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्रातील लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी सहभागी होऊन आपले मत मांडले.

यावेळी खासदार डॉ. किरसान यांनी, वाढत असलेली महागाई, सिमेंट, गिट्टी, रेती, लोहा सारख्या विविध वस्तूचे वाढते दर लक्ष्यात घेऊन, केंद्र सरकारच्या वतीने सुरु असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या हप्त्यात ग्रामीण भागात किमान 3 लक्ष रुपये पर्यत वाढ करण्यात यावी अशी मागणी केली. या सोबतच केंद्र सरकारच्या वतीने सुरु असलेल्या जलजीवन मिशन योजनेत मोठा भ्रष्टाचार होत असून, अजूनही बऱ्याच गावात नळ पोहचले नाही ज्या गावात नळ पोहचले त्या ठिकाणी पाणी नाही आणि पाणी पोहचले त्या ठिकाणी अशुद्ध पाणी मिळत असून नारिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत असून सदर योजनेच्या अमलबजावणीत सरकारने जातीने लक्ष घालून प्रत्येक नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळेल याकरिता प्रयत्न करण्याची मागणी खासदार डॉ. किरसान यांनी संसदेत केली. याचबरोबर गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्र आदिवासी बहुल क्षेत्र असून आदिवासी चे जल जंगल आणि जमिनीवरचे हक्क अबाधित राहण्याकरीता पेसा कायदा तयार करण्यात आले, मात्र प्रशासनाकडून यामध्ये ढवळा ढवळ केले जाते हे योग्य नसल्याचे खासदार डॉ. किरसान यांनी भावना व्यक्त केली.