जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या पुढाकाराने मरपली नाल्यावार होणार मोठा पूल

132

जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या पुढाकाराने मरपली नाल्यावार होणार मोठा पूल

 अहेरी : तालुक्यातील मरपली हा गाव आलापली सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरून उमानूर वरून ३ ते ४ कि. मी. अंतरावर उत्तरेकडे वसले आहे या. गावाची लोकसंख्या जवळपास ३०० ते ४०० येवढी आहे.
या परिसराला दैनंदिन जीवनात नेहमीच प्रत्येक समस्येवर सामना करावा लागतो. कारण या परिसरात आरोग्य, शिक्षण, विद्युत व दळणवळण इत्यादी समस्यांचा सामना प्रत्येक वर्षी करावा लागतो. कारण या गावाला जाण्यासाठी नाला असुन पुल नाही व या गावाला जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. तालुका स्थळावर शासकीय व खासगी कामासाठी तसेच दवाखान्यात उपचारासाठी याच मार्गाने जावे लागते.
तसेच त्या ठिकाणी कार्यरत असलेले प्रत्येक कर्मचारी ये जा करतात ते कर्तव्य बजावत असताना कर्मचार्‍यांना सुद्धा दळणवळण चा सामना करावा लागतो.
गेल्या ३ वर्षा अगोदर जिल्हाचे माजी पालकमंत्री स्वतः सदर नाल्याच्या पाण्यातून मार्ग काढून मरपली येथे गेले व पुल मंजुर करून देतो असे आश्वासन दिले. मात्र अद्यापही पुलाचे काम झाले नाही. आमदार, खासदार नेहमीच आश्वासन देत असतात मात्र पूर्तता केली नाही.
आँगस्ट महिन्यात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी सदर नाल्याच्या पाहणी केली असता नागरिकांनी पूल बांधण्याची मागणी केली. सदर बाब जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांना माहिती अवगत होती , गावाजवळील नाल्यावार जावून पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांना लक्ष देण्याचा निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषद कडून १ कोटी रुपये देवून सदर नाल्यावर मोठा पूल बांधून देण्यात येईल असे आश्वासन दिले होते ते पुर्ण होणार आहे.
यावेळी पंचायत समिती सभापती भास्कर तलांडे, जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, प्रशांत गोडसेलवार, कार्तिक तोगम, व गावातील नागरिक उपस्थित होते