महिलांनी कला व सुप्त गुणांना वाव द्यावे

124

महिलांनी कला व सुप्त गुणांना वाव द्यावे
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांचे प्रतिपादन
जागतिक महिला दिनी महिला सुरक्षा जनजागर

अहेरी :- महिलांनी कला व सुप्त गुणांना वाव देऊन विकासाला चालना द्यावी असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी केले.
ते 8 मार्च जागतिक महिला दिनी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित येथील इंडियन पॅलेस हॉल येथे महिला सुरक्षा जनजागर कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
कार्यक्रमाच्या उदघाटनस्थानी राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हाध्यक्षा शाहीन भाभी हकीम होते तर मंचावर मार्गदर्शक म्हणून महिला पोलीस उपनिरीक्षक आरती नरोटे, अडव्होकेट स्वाती जैनवार, ऍड. उदयप्रकाश गलबले होते.
अध्यक्षीयस्थानावरून पुढे बोलतांना, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम म्हणाले की, महिला ही आता अबला नसून सबला बनली आहे. महिलांमध्ये विविध कला व सुप्त गुण असून त्या सुप्त गुणांना जागृत करून आपली एक वेगळी छाप व समाजात वेगळा ठसा उमटविण्याचे आवाहन करून विविध उदाहरणासाहित महिलांचे महत्त्व यावेळी भाग्यश्रीताई आत्राम यांनी पटवून दिले.
उदघाटनीय स्थानावरून राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हाध्यक्षा शाहीन भाभी हकीम यांनी, महिलांच्या उन्नतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमी कल्याणकारी योजना व ऐतिहासिक निर्णय घेत असून खास करून पक्षाचे महिला सुप्रीमो संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे व राज्याचे प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर हे सदैव महिला व युवतींनी विकासाची उंची झेप घेण्यासाठी सदैव झटत असल्याचे सांगून महिलांनी निर्भीड व बेडरपणे विविध क्षेत्रात पाऊल टाकावे असे म्हणत मोलाचे मार्गदर्शन यावेळी केले.
यावेळी ऍड. स्वाती जैनवार, पोलीस उपनिरीक्षक आरती नरोटे, ऍड.उदयप्रकाश गलबले यांनी महिला सुरक्षेसंदर्भात कायदेविषयक सल्ले देऊन चिकित्सक व अभ्यासपूर्ण मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे अहेरी तालुकाध्यक्ष सारिका गडपल्लीवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार ममता पटवर्धन यांनी मानले. कार्यक्रमात महिला भगिनी उपस्थित होते.