माननीय आमदार नानाभाऊ पटोले यांच्या प्रयत्नाने अर्थसंकल्पात 70 कोटी रुपयांचे विकास कामे मंजूर

196

◆ माननीय आमदार नानाभाऊ पटोले यांच्या प्रयत्नाने अर्थसंकल्पात 70 कोटी रुपयांचे विकास कामे मंजूर

◆ जिल्ह्यांमध्ये निर्माण होणार अद्ययावत पायाभूत सुविधा

महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यापासून सातत्याने साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये विविध विकास कामे सुरू झालेली आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि साकोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार माननीय श्री. नानाभाऊ पटोले यांच्या विशेष प्रयत्नातून पुन्हा एकदा जवळपास 70 कोटी रुपयांची कामे मंजूर झालेली आहेत. यामध्ये सोनी आवळी ब्रिज 10 कोटी रु., सासरा मिरे गाव ब्रिज 18 कोटी रु., उमरी महालगाव ब्रिज 16 कोटी रु., पालांदूर मरेगाव जैतपुर रस्त्यावर चुलबंद नदी वर मोठ्या पुलाचे बांधकाम 16 कोटी रु., पालांदूर बायपास भूसंपादना करिता 2.5 कोटी रु., विरली खुर्द मोहरणा गवराळा रस्ता मजबुतीकरण व रुंदीकरण 7.5 कोटीरु., सिंदपुरी ते लाखांदूर रस्ता रुंदीकरणाच्या प्रकल्प अधिग्रहण कामाला 75 लाख, अड़याळ दिघोरी रस्ता रुंदीकरणाच्या प्रकल्प अधिग्रहणाकरिता 75 लक्षरु. असे एकूण जवळपास 70 कोटी रुपयांची कामे रस्ते व पूल बांधकामाची मंजूर झाले असून या सर्व कामांमुळे साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये रस्त्यांचे चांगले जाळे तयार होण्यासाठी निश्‍चितपणे मदत होणार आहे.