चंद्रपूर जिल्ह्यात गत 24 तासात 22 कोरोनामुक्त ; 96 पॉझिटिव्ह

180

गत 24 तासात 22 कोरोनामुक्त ; 96 पॉझिटिव्ह

Ø आतापर्यंत 23,307 जणांची कोरोनावर मात

Ø ॲक्टीव पॉझिटिव्ह 773

चंद्रपूर, दि. 11 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 22 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 96 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 24 हजार 481 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 23 हजार 307 झाली आहे. सध्या 773 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 27 हजार 302 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 776 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत 401 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 363, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 18, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 96 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 29, चंद्रपूर तालुका 11, बल्लारपूर एक, भद्रावती चार, ब्रम्हपुरी 18, नागभीड दोन, मूल एक, सावली एक राजूरा पाच, वरोरा 23 व इतर ठिकाणच्या एका रुग्णांचा समावेश आहे.

कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.