शहरातील युवकांनी तयार केला युट्यूब सिनेमा.
★उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी यांच्या हस्ते युट्यूब सिनेमाचा उदघाटन.
●सिरोंचा येथील युवक युट्यूबच्या माध्यमातून झळकणार छोटया पडध्यावर
सिरोंचा- सिरोंचा शहरातील तरूण युवकांनी एकत्र येत काहीतरी वेगळे करायचे असे मनात ठरवुन मागिल वर्षी 2020 मधे आॅक्टोंबर महिन्यात पत्रकार मोहमद इरफान व उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली युट्यूब सिनेमा चित्र लिला हा शाॅट सिनेमा दि 10माचऀ रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत स्वामी यांच्या हस्ते पोस्टर व सिनेमा प्रदर्शित करण्यात आले ,यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार महेश तिवारी, मोहमद इरफान हे प्रामुख्याने उपस्थित होते.सिनेमा मधिल सर्व युवक हे सिरोंचा शहरातील असुन लहान पणापासून त्यांना सिनेमा बनव मनात इच्छा होती त्यामुळे हे युवक एकत्र येऊन सिनेमा बनवायच्या तयारीला लागले सिनेमा बनवताना त्यांना अनेक अडचणिचा सामना करावा लागला पण ते आपल्या जिदीवर कायम रहात शाॅट फिल्म च्या शुटींग सुरुवात त्यांनी ऑक्टोंबर 2020 मधे केली व दिनांक 10मार्च 2021 रोजी हा सिनेमा रिलीज केला, सिनेमा डायरेक्टर लाजर बोलापली,प्रोडूसर अरुण तोकला , मुजीक कल्याण पेदापली याने दिले आहे.तर सिनेमाची कथा माही घरपट्टी यांनी लिहिली आहे.कलाकार म्हणून सिनमामधे सुनिल राजु घरपट्टी,कु. कल्याणी दुर्गम (नायिका), संदीप मंचालाऀ विलण म्हणून महेंद्र घरपट्टी (लेखक)यानची मुख्य भुमिका या सिनेमात झळकत आहे. सिनेमा चे चित्रीकरण हे संपूर्ण सिरोंचा शहरातील विविध भागात झाले आहे.चित्रपटातील कथा हि एक प्रेम कथा असून नायक नायिकाची भेट सुरूवातीला तेलंगाना तील मंदीरामधे होते त्या नंतर सिरोंचा शहरातील काॅलेज मधे शिक्षण घेताना दोघांत प्रेम जुळते सिनेमा मधील वीलण हा नायिकेला एकतर्फी प्रेम करीत असतो पण ती त्याला सतत नकार देत असते, चित्रपटाच्या माध्यमातून युवकांना प्रेमा बाबतीत काय होईल या बाबतीत संदेश युवा पिढीला दिला आहे. हा सिनेचा दुसरा भाग असुन पहिला भाग मागिल वर्षी प्रदर्शित करण्यात आला होता. काहीका होणा आपल्या जिदीवर कायम राहून निराश न होता सिनेमा तयार करून प्रसिद्ध केल्या बाबतीत सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.