*समाजात एकता निर्मान करण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजानी केले*- खासदार डॉ. नामदेव किरसान यांचे प्रतिपादन

14

*समाजात एकता निर्मान करण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजानी केले*- खासदार डॉ. नामदेव किरसान यांचे प्रतिपादन

 

*शिवरायांचे विचार आत्मसात करा* — महेंद्र ब्राह्मणवाडे

 

*इंदाळा येते शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी*

 

गडचिरोली :: सहयोगी युवती क्लब, इंदाळा च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त, समाज प्रबोधन कार्यक्रम पार पडले.

छत्रपती शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष राजे होते त्यांनी सर्व धर्माचा नेहमी आदर केला . समाजात एकता निर्मान करण्याचे काम त्यांनी केले आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी यावेळी केले.

शिवजयंती साजरी करतांना फक्त मीरवण्यासाठी न ठेवता त्यांचे विचार आत्मसात करा तेव्हा खऱ्या अर्थानी शिवजयंती साजरे करण्याचा सार्थक होईल असा संदेश महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी आपल्या मार्गदर्शनीय भाषनात दिला.

या कार्यक्रमास गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव जी किरसान, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, युवक काँग्रेस प्रदेश सचिव ऍड. विश्व्जीत कोवासे, सहकार सेल अध्यक्ष अब्दुलभाई पंजवानी, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, ग्रा. प. पारडी सरपंच संजयभाऊ निखारे, चारू पोहने, योगेंद्र झंजाळ, दत्तू सूत्रपवार, घनश्याम कोलते, ज्ञानेश्वर बघमारे, अरुण शेंडे सह इतर मान्यवर व मोठ्या संख्येने गावकरी, माता भगिनीं यावेळी उपस्थित होते.