पंचायत समिती एटापल्ली अंतर्गत ग्रापंचायत तोडसा मौजा लांजी या गावी भव्य कृषी मेळाव्याचे आयोजन

12

पंचायत समिती एटापल्ली अंतर्गत ग्रापंचायत तोडसा मौजा लांजी या गावी भव्य कृषी मेळाव्याचे आयोजन

एटापल्ली : वृत्तवाणी न्युज

 

दिनांक १९. ०२. २०२५ रोजी पंचायत समिती, एटापल्ली अंतर्गत ग्रामपंचायत तोडासा मौजा -लांजी या गावी भव्य कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यातं आले होते. मेळाव्याला उदघाटक म्हणून पंचायत समिती एटापल्ली चे गट विकास अधिकारी डॉ. आदिनाथ आंधळे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ग्रामपंचायत तोडसाचे उपसरपंच प्रशांत भाऊ आत्राम उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीचे कृषी अधिकारी तुषार पवार, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे श्री डोंगरे, श्री गिरासे, पोलीस पाटील राजू कुमोटी, सहायक शिक्षक मोहन चांदेकर, दिगंबर लव्हाळे, हमीद पठाण, प्रतिष्ठित नागरिक डोलू पुंगाटी, ओसवाल तिरकी तसेच गावातील शेकडो नागरिक प्रामुख्याने हजर होते. सदर कृषी मेळाव्याची प्रास्ताविक कृषी अधिकारी तुषार पवार यांनी केले. मेळाव्यात बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रम, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, नरेगा अंतर्गत सिंचन विहीर,मजगी,बोडी ई., 90 टक्के अनुदानावर भाजीपाला मिनीट बियाणे, 75 टक्के अनुदानावर जाळीचे तार, 75 टक्के अनुदानावर ताडपत्री, पिक विमा योजना, ऍग्री स्टॅक योजना, कृषी यांत्रिकीकरण योजना, पीक प्रात्यक्षिक, रासायनिक खताचा वापर, नॅनो युरिया चे फायदे, पोखरा अंतर्गत योजना आधी प्रामुख्याने योजनेवर पंचायत समितीचे कृषी अधिकारी तुषार पवार यांनी मार्गदर्शन केले. सदर मेळाव्यात बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सन २०२४-२०२५ अंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेशाची वितरण करण्यात आले. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान वापर करून शेती केली पाहिजे धान पिका बरोबर फळबाग लागवड, भाजीपाला लागवड व फुलशेती कडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे गटविकास अधिकारी डॉ. आदिनाथ आंधळे यांनी प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामपंचायत तोडसा चे उपसरपंच प्रशांत भाऊ आत्राम यांनी शासकीय योजनेचा लाभ घेऊन स्वतःचा विकास साधावा असे आव्हान उपस्थित शेतकऱ्यांना केले. सदर मेळावा कृषी विकास अधिकारी कु. किरण खोमणे, जिल्हा कृषी अधिकारी प्रदीप तुमसरे, आनंद पाल,श्रीकृष्ण पेंदाम यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व आभार सहाय्यक शिक्षक त्रिमूर्ती भिसे यांनी केले.