दामरंचा येते तलाव खोलीकरण कामाचे भूमिपूजन

94

दामरंचा येते तलाव खोलीकरण कामाचे भूमिपूजन

अहेरी पंचायत समितीचे सभापती श्री.भास्कर तलांडे यांच्या हस्ते भूमिपूजन

▪️परिसरातील शेतकऱ्यांना होणार सिंचनाची सोय.

अहेरी :- तालुक्यातील दामरंचा येते मामा तलाव असुन गेल्या अनेक वर्षापासून खोलीकरण करण्यात आले नाही.सदर कामांसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी गडचिरोली जिल्हा परिषदेकडून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जलसंधारण विभागाकडून निधी मंजूर करण्यात आले. तलाव खोलीकरण कामाचे भूमिपूजन अहेरी पंचायत समितीचे सभापती श्री.भास्कर तलांडे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.
दामरंचा येथील तलाव मागील अनेक वर्षांपासून खोलीकरण केले नसल्याने या परिसरातील भंगारामपेठा,वेलगुर,रूमलकसा आदि गावातील शेतकऱ्यांना बिनउपयोगी ठरत होते.मागील दौऱ्यात येथील गावकऱ्यांनी ही समस्या जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या निदर्शनास आणून दिले असता जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे येथील नागरिक व शेतकऱ्यांना ग्वाही दिले होते. जिल्हा परिषदेच्या मागील नियोजन समितीच्या सभेत दामरंचा येतील तलाव खोलीकरण कामासाठी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी संबंधित विभागाला आवश्यक निधी उपलब्ध करून दिले.जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या दामरंचा येथील सर्व गावकरी व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
तलाव खोलीकरण झाल्यास पाण्याची साठवणूक जास्त होऊन शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होईल म्हणून,पूरकपणे पीक घेण्यास सोईचे होईल.
भूमिपूजन सोहळा प्रसंगी प.स.सभापती श्री.भास्कर तलांडे यांच्या समवेत दामरंचा ग्राम पंचायतचे सरपंचा सौ.किरण कोडापे,उपसरपंचा सौ.ज्योती सुरमवार,जलसंधारण उपविभागीय अभियंता श्री.इंगोले साहेब,पेसा समन्वय श्री.एस.कोठारी सर, श्री.प्रमोद कोडापे,गोपाल सुरमवार,भास्कर कोडापे,समया चौधरी,समया लिंगम,गंगाराम गावडे,प्रकाश दुर्गे,सचिव श्री.पुराम सर नागरिक ,शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्तीत होते.