मराशिप च्या वतीने महिलादिन साजरा

13

मराशिप च्या वतीने महिलादिन साजरा. चामोर्शी— मराशिप चे नागपूर विभागीय कोषाध्यक्ष तथा गडचिरोली जिल्हा पालक संतोष सुरावार यांचे मार्गदर्शनाखाली दि.9-3-2025 ला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली तर्फे जागतिक महिला दिन नगरपंचायत सांस्कृतिक भवनात संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर पाहुण्यांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे सहमहिला आघाडी प्रमुख नागपूर विभाग मा. मृणाल तुम्पल्लीवार, कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या मान.आरती भिमनवार महिला संस्कार कलश संस्था अध्यक्षा, प्रमुख वक्त्या डॉक्टर देवरी मॅडम ग्रामीण रुग्णालय चामोर्शी, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. कल्याणी पुठ्ठेवार PSI पोलीस विभाग चामोर्शी, मा. ज्योती जिचकार महिला आघाडी प्रमुख तालुका चामोर्शी, मा.वर्षा वैभव भिवापुरे नगरसेविका नगरपंचायत चामोर्शी उपस्थित होत्या. डॉ.देवरी मॅडम यांनी स्त्रियांचे आरोग्य व काळजी यावर मार्गदर्शन केले, मा. कल्याणी पुठ्ठेवार यांनी महिला सुरक्षा व सायबर गुन्हे यावर प्रकाश टाकला. आरती भिमनगर यांनी महिलांचे सक्षमीकरण यावर मार्गदर्शन केले. सौ .वर्षा भिवापूरे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. सौ .ज्योती जिचकार यांनी महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. मृणाल तुमपल्लीवार यांनी महाराष्ट्र शिक्षक परिषदेत महिलांचे योगदान व अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. ऐतिहासिक महिलांच्या वेशभूषा स्पर्धा घेण्यात आल्या यात अनेक महिलांनी सहभाग घेतला. महिलांसाठी खेळ घेण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सौ.भारती तितरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. नम्रता मार्तीवार यांनी केले.