लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड यांच्या वतीने आयोजित गडचिरोली डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग अंतिम टप्प्यात
लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड यांच्या वतीने आयोजित गडचिरोली डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग (GDPL) यंदा प्रचंड उत्साहात रंगतदार टप्प्यावर पोहोचली आहे. संपूर्ण जिल्ह्याच्या क्रीडा रसिकांचे लक्ष लागून राहिलेल्या या स्पर्धेतील सेमीफाइनल आणि अंतिम सामने
१९ मार्च २०२५ ला संध्याकाळी ४ ते ७ वाजेपर्यंत होईल.
अंतिम सामन्यानंतर, संध्याकाळी ७ वाजता विजेत्यांचा प्रेझेंटेशन समारंभ आणि त्यानंतर प्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्या स्वरांनी नटलेला संगीतमय कार्यक्रम होणार आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या क्रीडाप्रेमींनी आणि कुटुंबासह उपस्थित राहून आपल्या आवडत्या संघाला प्रोत्साहन द्यावे आणि या शानदार सोहळ्याचा आनंद लुटावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे