*_सावली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक: भाजपच्या विजयासाठी आढावा बैठक संपन्न.._* *_मतभेद विसरून एकत्रितपणे काम करून विजय सुनिश्चित करा – मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांचे बैठकीत प्रतिपादन _*

13

*_सावली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक: भाजपच्या विजयासाठी आढावा बैठक संपन्न.._*
*_मतभेद विसरून एकत्रितपणे काम करून विजय सुनिश्चित करा – मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांचे बैठकीत प्रतिपादन _*

सावली, दि. २१ मार्च २०२५:

सावली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २०२५ ते २०३० या पंचवार्षिक निवडणुकीसाठी एकूण १८ संचालकांची निवड केली जाणार आहे. या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांची निश्चित करण्यासाठी गोसीखुर्द शासकीय विश्रामगृह, सावली येथे नियोजन व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले.

बैठकीचे अध्यक्षस्थान माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी भूषवले. मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, “कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या हिताची असून, भाजपचे केंद्र व राज्य सरकार हे शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध उपक्रम राबवले आहेत.आपले सरकार हे शेतकऱ्याच्या हिताचे सरकार असून नुकतेच हेक्टरी २० हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय जाहीर करून शेतकऱ्यांना आधार दिला आहे.”
भाजपचा विजय सुनिश्चित करण्यासाठी मतभेद विसरून सर्वांनी एकजूट होऊन कार्य करावे, असे आवाहन यावेळी केले.
*_डॉ. अशोकजी नेते यांचा ‘सोशल वर्क’ क्षेत्रातील योगदानाबद्दल सत्कार_*

पुढे बोलताना डॉ. नेते म्हणाले, “राजकारण हे देखील सामाजिक कार्याचाच एक भाग असून, गेल्या ४० वर्षांत मी जनहितासाठी कार्यरत आहे.” त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल पुण्यातील नामवंत ‘जाधवर ग्रुप’ संस्थेतर्फे ‘सांसद आदर्श पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तसेच आता नुकतेच गोवा येथे ‘सोशल वर्क’ क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी डॉक्टरेट पदवीने सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी सावली तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले आणि लोकसभा निवडणुकीतील सहकार्याबद्दल उपस्थितांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

*_सावलीत भाजपच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी एकजूट रहावे – संध्या ताई गुरनुले_*
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या ताई गुरनुले यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “मूल येथे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढवली नसल्यामुळे विरोधकांचा मोठा गट निर्माण झाला. त्यामुळे सावलीतील निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचा विजय होण्यासाठी जोरदार तयारी करणे आवश्यक आहे.” अशा विजयासाठी शुभेच्छा देत मत व्यक्त केल्या.

या बैठकीचे संचालन व कृषी उत्पन्न बाजार समिती विषयी माहिती भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अविनाश भाऊ पाल यांनी दिली, तर आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष अर्जुन भाऊ भोयर यांनी केले.

*बैठकीस उपस्थित मान्यवर:*
मा.खा. डॉ. अशोकजी नेते, माजी.जि.प.अध्यक्षा सौ. संध्याताई गुरनूले,भाजपा तालुकाध्यक्ष अर्जुनभाऊ भोयर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अविनाशभाऊ पाल,माजी बांधकाम सभापती,जि.प.संतोष भाऊ तंगडपल्लीवार, भाजपा ज्येष्ठ नेते देवरावजी सा. मुद्दमवार,तालुका महामंत्री तथा नगरसेवक सतिशभाऊ बोम्मावार,तालुका महामंत्री सचिनभाऊ तंगडपल्लीवार,मुल पंचायत समिती सभापती
चंदुभाऊ मारगोनवार,संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष प्रकाश पा. गड़्डमवार,सामाजिक नेते देविदासजी बानबले,जेष्ठ नेते दौलतजी भोपये,अरुणजी पाल, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा
सौ. छायाताई चकबंडलवार,
शहराध्यक्ष आशिष कार्लेकर, पुष्पाताई शेरकी,जितुभाऊ धात्रक,विनोद धोटे,अभय लाटकर,डॉ.गंगाधर धारणे, आशिष भांडेकर, दादाजी पा. किनेकर,विलास कावडे,मुक्तेश्वर थोराक तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या आढावा बैठकीत सावली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित करण्यासाठी आवश्यक नियोजन आणि एकजूट या मुद्द्यांवर भर देण्यात आला. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीत एकत्रितपणे काम करून विजय मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला.
[२३/३, ४:२९ AM] चनावार साहेब गडचिरोली: *माजी मंत्री आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या उपस्थितीत पदाधिकारी आढाव बैठक व पक्षप्रवेश सोहळा संपन्न*

आज दिनांक 22 मार्च रोजी शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथे *राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या वतीने माजी मंत्री तथा अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम* यांच्या उपस्थितीत पदाधिकारी आढाव बैठक व पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. या आढावा बैठकीत उपस्थित पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी मार्गदर्शन केले. यावेळेस हसीना शेख, नामदेव उडान,उत्तम कोवे, शीतल दूधबावरे,अर्चना कारपेमवार, रूपाली दूध बावरे, मंगेश मळावी,दीपक मेश्राम, आकाश गेडाम, सुरेश तलांडे, सुनील नागपुरे आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला. आमदार धर्मरावा आत्राम यांनी सर्वांचे पक्षाचा दुपट्टा टाकून त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळेस नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत सुद्धा करण्यात आला. सदर कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर,माजी आमदार रामकृष्ण मडावी, जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख,महिला जिल्हाध्यक्ष डॉक्टर सोनल कोवे,*राष्ट्रवादी कांग्रेस युवती जिल्हाध्यक्षा तनुश्रीताई आत्राम* , प्रदेश सरचिटणीस अलोणे ताई,माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन राव आत्राम, अहेरी विधानसभा कार्याध्यक्ष सारिका गडपल्लीवार, यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते…..

🔗 FACEBOOK
https://www.facebook.com/share/p/1B8YnxLGFF/
🔗 INSTAGRAM
https://www.instagram.com/p/DHgWRjbzbef/?utm_source=ig_web_copy_link