*गुढीपाडव्याला महिलांच्या भव्य पैदल रॅलीत महिलांनी सहभागी व्हावे* गीता हिंगे यांचे आवाहन

24

*गुढीपाडव्याला महिलांच्या भव्य पैदल रॅलीत महिलांनी सहभागी व्हावे* गीता हिंगे यांचे आवाहन

गडचिरोली :वृत्तवाणी न्युज

दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गुडीपाडवा म्हणजेच मराठी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गुडीपाडव्याच्या पूर्व संध्येला म्हणजेच २९ मार्च रोज शनिवारला दुपारी 4-30 वाजता महिलांची ढोल ताशांच्या गजरात भव्य पैदल रॅली निघणार आहे. तरी गडचिरोली शहरातील सर्व महिलांनी रॅलीत सहभागी होऊन मराठी नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करावे असे आवाहन रॅलीच्या संयोजिका गीता हिंगे तसेच सहसंयोजिका सुनीता साळवे, सीमा कन्नमवार ,मिनल हेमके, दिप्ती वैद्य यांनी केले आहे. यावर्षी विशेष म्हणजे महिलांचेच ढोल पथक राहणार आहे.ज्या महिलांना ढोल पथकात भाग घ्यायचा असेल त्यांनी खालील नंबर वर संपर्क साधावा.

9168164441 , +91 94231 22934,+91 95118 92706, +91 75882 42518 ,94208 53138