भरारी आरोग्यवर्धिनी संस्था गडचिरोली च्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर

11

भरारी आरोग्यवर्धिनी संस्था गडचिरोली च्या वतीने शनिवार, दिनांक 22 मार्च, २०२५ रोजी गडचिरोली शहरातील डॉ. कोहळे हॉस्पिटल हनुमान वॉर्ड गडचिरोली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. शिबिरात 90 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आले 90 रुग्ण मधून ज्यांचे स्त्री रोग संबतीत शस्त्रकीया करिता 4 रुग्ण निघाले त्यांचे महात्मा ज्योतिबा फुले योजने मधून मोफत शस्त्रक्रिया करून देण्याबाबत भरारी कार्यकारणी मधील सर्वांनी आश्वासन दिले.. तसेच 3 रुग्ण कॅन्सर शक्यता असल्याने त्यांचे रक्त तपासणी पाटवण्यात आले आहे. सुप्रसिद्ध डॉ.प्रवीण खरवडे स्त्रीरोग तज्ञ नागपूर यांचं कळून 90 रुग्णांची तपासणी करण्यात आले व रक्त चाचणी व औषधोपचार करण्यात आला. डॉ.शिल्पा कोहळे , डॉ.कापगते, डॉ.आटमांडे, डॉ.के.कोहळे ,सौ.शायली पोटवार, डॉ.मनिषा गेडाम , सोनालीताई बिजवे, कविता धाइत, उमा देवाईकर,संतोष करपे,स्नेहल संतोषवार, कुंदन, स्वप्नील चापले,मंगेश , अबुल यांनी सर्वांनी मिळून शिबिर ला हाथ भार लावून शिबिर योग्य रित्या यशस्वी करण्यात यश प्राप्त झाले. सर्वांना मनापासून धन्यवाद सर्वांना च्या सपोर्ट ने शिबीर हे योग्य रित्या पार पाडण्यात आले असेच नेहमी सहकार्य करत रहा. 👏🙏.🙏👏