*दिपक धाम गौशाला येथे माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांची भेट*
*दिप फाउंडेशन द्वारा संचालित दिपक धाम गौशाला चामोर्शी*
*दानशूर शेतकरी श्री. विश्वनाथ सोमणकर यांच्या कडून गौशाला साठी दोन हेक्टर शेती दान दिली*
*दि. 22 मार्च 2025*
*चामोर्शी : दिप फाउंडेशन द्वारा संचालित दिपक धाम गौशाला चामोर्शी येथे मागील तीन महिन्यापासून सुरु असलेल्या गोमातेचे रक्षण करण्याकरिता बजरंग दल व विश्व हिंदू परिषेदेचे कार्यकर्त्यांनी सहकार्य करीत असून चामोर्शी शहरालगत चिचडोह बॅरेज जवळ गौशाला मध्ये शेकडो गोमाता आहेत. तरी शेड व सोई सुविधा करिता दानशूर नागरिकांनी मदत करण्याचे माजी आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवरावजी होळी यांनी आश्वासन देत जिल्ह्यातील नागरिकांनी गोमातेच्या रक्षणकरिता दिप फाउंडेशन द्वारा संचालित दिपक धाम गौशाला मदत करण्याचे आव्हान केले*
*यावेळी वैभव सोमणकर, साईनाथ बुरांडे, महादेव थोरेवार प्रज्वल सोमणकर, विशाल सोमणकर, साईनाथ लटारे, अक्षय नागापुरे, विशाल नागापुरे, प्रीतम तुळसकर, धनंजय देवाण भेटी दरम्यान उपस्थित होते.*