महिला दिनाच्या निमित्ताने मुंबई येथे महिला सम्मेलन मेळाव्याचे आयोजन
दिनांक 23 मार्च 2025 रोजी मुंबई मधिल चेंबूर येथे अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या पुण्यतिथीच्या निमीत्ताने तसेच त्यात महिला जागतिक दिन व इतर महिलांवरील दिनांचे एकत्रीकरण करून आजचे अहिल्याबाई होळकर दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सामाजिक कार्य करणार्या सर्व महिला पाहुण्यांना तसेच अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या निरीक्षकांना आमंत्रित करण्यात आले होते व त्यात सामाजिक कार्य करणार्या पाहुण्यांच्या माध्यमातून स्रि शक्तीबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. या जगात एका नारीचे अस्तित्व काय, नारीशक्ती म्हणजे काय? याचे सुंदर उदाहरण आमंत्रित पाहुण्यांनी पटवून दिले.
त्यातच आजच्या 300 व्या अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सामाजिक कार्य करणार्या अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद च्या प्रदेश कार्याध्यक्षा मा. वर्षाताई अशोक जी आत्राम मॅडम यांना उत्कृष्ट सामाजिक कामगिरी केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते शाॅल आणि पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.