विनाशकारी लोह प्रकल्पाची पोलखोल टाळण्यासाठी रोखले : बोगस जनसूनावणी विरोधात तक्रार दाखल करणार

8

 

विनाशकारी लोह प्रकल्पाची पोलखोल टाळण्यासाठी रोखले : बोगस जनसूनावणी विरोधात तक्रार दाखल करणार

 

शेकाप, भाकप, माकप या डाव्या पक्षांच्या नेत्यांना जनसूनावणीत सहभागी होण्यास पोलिसांचा मज्जाव

 

गडचिरोली : वडलापेठा येथे प्रस्तावित स्पाॅंज आयर्न प्रकल्प हा जगातील सर्वात उच्च प्रतीचा प्रदुषण निर्माण करणारा प्रकल्प असून तो पाचव्या अनुसूची क्षेत्रातील अनेक तरतूदी धाब्यावर बसवून बेकायदा पध्दतीने करण्याचा प्रयत्न असून पर्यावरणीय मुद्यांवर आक्षेप नोंदवू नये यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. देवराव चवळे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे काॅ.अमोल मारकवार यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर पोलिसांनी जनसूनावणी संपेपर्यंत अडवून ठेवले.

 

सदर जनसूनावणी ही सर्वांसाठी खुली असतांना केवळ प्रकल्पाची पोलखोल होवू नये यासाठी आम्हाला विविध कारणे सांगून पोलीसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर जनसूनावणी संपेपर्यंत अडवून ठेवले. यापूर्वीही तगडा पोलीस बंदोबस्त लावून जनसूनावणीत सहभागी होण्यासाठी आम्हाला रोखण्यात आलेले होते. त्यामुळे या अशा बोगस जनसूनावण्यांच्या विरोधात वरिष्ठ स्तरावर लवकरच सविस्तर तक्रार दाखल करुन न्याय मागण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. देवराव चवळे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे काॅ.अमोल मारकवार यांनी दिली असून हुकूमशाही पध्दतीने घेतलेल्या जनसूनावणीचा निषेध केला आहे.