*गडचिरोली शहरात अत्याधुनिक नाटय / सांस्कृतिक सभागृह उभारावे. – माजी. आमदार डॉ. नामदेव उसेंडी*
गडचिरोली शहरातील लोकसंख्या जवडपास ८०हजार असून गडचिरोली शहराला व जिल्ह्याला झाडीपट्टी नाट्य रंगभूमीचा इतिहास लाभलेला आहे. तसेच गडचिरोली जिल्ह्यात विकासाला सुरवात झाली असल्याने विविध सांस्कृतिक कार्यक्रम व बैठका घेण्यासाठी अद्यावत सभागृह उपलब्ध नाही. हि अडचण लक्षात घेता डॉ . नामदेवराव उसेंडी माजी. आमदार गडचिरोली विधान सभा क्षेत्र यांनी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री नामदार ऍंड. आशिष शेलार साहेबची अधिवेशन काळात विधान भवन मुंबई येथे भेट घेतली व चर्चा केली. तसेच निवेदन देऊन गडचिरोली शहरात अद्यावत नाट्य / सांस्कृतिक सभागृह मंजूर करण्याकरिता निवेदन देऊन मागणी केली. यावर मंत्री महोदयांनी साकारातक निर्णय घेऊन गडचिरोली जिल्यातील गडचिरोली शहरात नाट्य / सांस्कृतिक सभागृह मंजूर करण्याचे आश्वासन दिले.