*गुडीपाडव्याच्या पूर्वसंध्येला ढोल ताशाच्या गजरात मराठमोळ्या वेशभूषेत निघाली महिलांची पैदल रॅली*

28

*गुडीपाडव्याच्या पूर्वसंध्येला ढोल ताशाच्या गजरात मराठमोळ्या वेशभूषेत निघाली महिलांची पैदल रॅली*

*गडचिरोली दि. २९-३-२०२५*

प्रभू श्रीराम चौदा वर्ष वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसाचा वध करून गुडीपाडव्याच्याच दिवशी अयोध्येला परत आले.ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली असे म्हटले जाते.भारतीय संस्कृतीने विश्वाला आनंदी जीवन जगायला शिकवणारी जीवन पद्धत घालून दिली आहे. त्यामुळे अशा महान संस्कृतीने ठरवून दिलेल्या वर्षारंभ गुढीपाडव्याला साजरा करून आपल्या संस्कृतीची माहिती व ओळख नवीन पिढीला करून द्यावी या हेतूने आधारविश्व फाऊंडेशन च्या अध्यक्षा गीता हिंगे यांच्या नेतृत्वात गडचिरोली शहरात जवळपास दहा वर्षापासून या दिवशी मराठमोळ्या वेशभूषेत महिलांची स्कूटी रॅली काढण्यास सुरुवात केली.यावर्षी महिलांची पैदल रॅली काढली कारण की यावेळेस महिलांचेच ढोल पथक तयार करण्यात आले. हे यावेळेस चे खास वैशिष्ट्य होते. ढोल पथक साठी गीता हिंगे आणि सुनीता साळवे यांनी विशेष मेहनत घेतली. आशयप्रकारे समोर बुलेट राणी म्हणून प्रतिमा सोनुले, त्याच्या मागे घोड्यावर सवार झाशीची राणी लक्ष्मीबाई च्या वेषात अनिता दासरवार त्यामागे भगवा ध्वज घेऊन महिला आणि त्यानंतर २० महिलांचे ढोल ताशा पथक व त्यानंतर पारंपारिक वेशभूषेतील महिला आणि रथावर आरूढ राम, लक्ष्मण, सीता, हनुमान अशी झाकी. शिवगर्जना आणि शंख वाजवून चामोर्शी रोडवरील साई मंदिर मधून रॅलीची सुरुवात झाली. आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांनी हिरवी झेंडी दाखवून तसेच प्रमुख अतिथी म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत भाऊ वाघरे, अनिलभाऊ तिडके, अनिलभाऊ पोहनकर, चंचल काबरा, ज्योती देवकुले, वैभवी होकम यांनी रॅलीतील महिलांना शुभेच्छा देऊन रॅलीची सुरुवात केली.ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव करून रॅलीचे स्वागत करण्यात आले. रॅलीतील महिलांसाठी लॉयड्स मेटल्स कडून इंदिरा चौकात थंड पाण्याची व्यवस्था केली होती. बी फॅशन प्लाझा यांचेकडून आईस्क्रीम, हनुमान मंदिरासमोर किशोरभाऊ सोमलकर यांचेकडून थंड पाणी, बिस्कीट, चिक्की व त्रिमूर्ती चौक येथे शर्मा परिवार व भारत भाऊ खटी यांचेकडून फुलांचा वर्षाव करून रॅलीचे स्वागत करून सर्वांना थंड पाणी चॉकलेट वाटप करण्यात आले. परत येताना अभिलाषा चौधरी मॅडम यांचेकडून इंदिरा चौकात केळ आणि सरबत चे आयोजन केले होते.रॅलीचा समारोप चामोर्शी रोडवरील राधे बिल्डिंग मधे करण्यात आला.दरवर्षीप्रमाणे महेशजी काबरा यांचेकडून रॅलीतील सर्वांसाठी नाश्त्याचे आयोजन केले होते. यावेळेस महिलांचेच ढोल पथक हा गडचिरोलीकरांसाठी कुतुहलाचा विषय होता.ढोल पथकातील सर्व महिलांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे कारण चामोर्शी रोडवरील साई मंदिरापासून सुरुवात ते आठवडी बाजार हनुमान मंदिर पासून पुन्हा इंदिरा चौक आणि समारोप राधे बिल्डिंग इतके अंतर कमरेवर ढोल बांधून वाजवत अंतर पार करणे सोपे नव्हते. गडचिरोलीत पहिल्यांदाच महिलांचे ढोल पथक बघून सर्व कुतूहलाने बघत होते.
रॅलीतील सर्व महिलांना गुडीपाडवा निमित्त सुरेख अशी नथ भेट देण्यात आली तसेच ढोल पथकातील सर्व महिलांचा गीता हिंगे आणि सुनीता साळवे यांनी गुडी देऊन सन्मान केला.रॅलीसाठी आमदार मिलिंदजी नरोटे,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतभाऊ वाघरे, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुशीलजी हिंगे यांचेकडून आर्थिक सहकार्य लाभले. रॅलीसाठी ढोल पथक चे प्रशिक्षक दिपक जाधव यांनी अथक परिश्रम घेतले. ढोल पथकात मिनल हेमके, दिप्ती वैद्य, योगिता दशमुखे, अल्का पोहणकर, पायल नार्देलवार, राखी बेहरे, साक्षी साळवे, सीमा कन्नमवार, प्रतिमा सोनवणे, भूमिका बरडे, भारती खोब्रागडे, ज्योती सज्जनपवार, मुक्तावरम, गौरी शर्मा, मंजुषा कत्रोजवार, अर्चना कत्रोजवार,अर्चना मुनगंटीवार,मेघा कोठारे, सुनीता आलेवार, मंजुषा आंबटकर सहभागी झाल्या होत्या.तसेच रॅलीमध्ये आधारविश्व फाऊंडेशन, नारी शक्ती ग्रुप,साई सेवा समितीच्या सदस्या तसेच गडचिरोली शहरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.