अंगणवाडी कामकाजाच्या वेळेत बदल करा  मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मागणी

24

 

अंगणवाडी कामकाजाच्या वेळेत बदल करा

 

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मागणी

 

गडचिरोली : 1 एप्रिल पासुन जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांच्या वेळेत बदल करून सकाळी 7.15 ते दुपारी 1.45 पर्यंत करण्यात आली आहे. परंतु सध्या वातावरणात तापमानाची वाढ झाली आहे व येणाऱ्या महिन्यात पुन्हा तापमान वाढ होणार आहे. अंगणवाडीत येणारे मुले लहान असतात. वाढत्या तापमानामुळे त्याना त्रास होऊन उष्माघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे अंगणवाडी केंद्रांच्या वेळेत बदल करावा, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार यांनी केली आहे.

 

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अंगणवाडी केंद्रात विद्युत पुरवठा नसल्याने अंगणवाडी सेविका व मदतनीसास त्या वेळेत काम करने अडचणीच होणार आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना सकाळी 7.15 ते 11.15 ही वेळ आहे त्या आधारे अंगणवाडी कामकाजाचे वेळ सकाळी 7.15 ते दुपारी 12.00 पर्यंत ठेवण्यात यावी, अशीही मागणी काॅ. अमोल मारकवार यांनी केली आहे.

 

महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना इंगोले यांनाही निवेदन देवून शिष्टमंडळाने यासंदर्भात चर्चा केली. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, अर्चना मारकवार,अंगणवाडी सेविका योगीता मुनघाटे , भुमिका बोराटे,मनीषा गडसुलवार,मनीषा लोणारे, अर्चना ढवळे प्रामुख्याने उपस्थित होते.