*मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांनी चामोर्शीत वायलालवार कुटुंबीयांची भेट घेत केले सांत्वन_*

35

*मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांनी चामोर्शीत वायलालवार कुटुंबीयांची भेट घेत केले सांत्वन_*

 

चामोर्शी | ०७ एप्रिल २०२५:

 

चामोर्शी नगरपंचायतचे गटनेते नितिनजी वायलालवार यांच्या आई स्व. उषाताई प्रमोद वायलालवार यांचे दिनांक २७ मार्च रोजी वयाच्या ७२व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण वायलालवार परिवारावर शोककळा पसरली आहे.

 

या दुःखद घटनेची माहिती मिळताच माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री मा. डॉ. अशोकजी नेते यांनी चामोर्शी येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन वायलालवार कुटुंबीयांचे सांत्वन केले. “या कठीण प्रसंगी आम्ही संपूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी आहोत. तुमच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.” त्यांच्या या आश्वासक व संवेदनशील शब्दांनी कुटुंबीयांना मोठा मानसिक आधार मिळाला.

 

या भेटीदरम्यान भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अरुणजी हरडे,सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष आशिष भाऊ पिपरे, सामाजिक नेते अमोलभाऊ आईचवार, नगराध्यक्षा जयश्रीताई वायलालवार तसेच वायलालवार परिवारातील सदस्य उपस्थित होते.

 

मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांच्या संवेदनशील भेटीने व सांत्वनपर शब्दांनी कुटुंबीयांना मानसिक बळ मिळाले असून, या कठीण प्रसंगात समाजातील प्रत्येक घटकाने एकमेकांना आधार देण्याची गरज आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.