*आष्टी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजीत पवार गटाचा महिला पक्ष प्रवेश व सदस्य नोंदणी मेळावा संपन्न.*
*आष्टी* – येथे मा.ना. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे व आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या आदेशाने आणी महिलाध्यक्ष डॉ.सोनल कोवे व सिनेट सदस्या तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाने आणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महिला जिल्हाउपाध्यक्ष सौ.पुष्पा बुर्ले यांच्या नेतृत्वात सदस्य नोंदणी व महिला पक्षप्रवेश मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर होते तर अध्यक्ष म्हणून डॉ.सोनल कोवे तर प्रमुख पाहुणे म्हणून सिनेट सदस्या तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम होत्या.
कार्यक्रमात असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते आणी मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणीला सुरुवात झाली.
आष्टी येथिल अनेक युवक,युवती,महिला यांनी पुष्पा बुर्ले व प्रणय बुर्ले यांच्या नेतृत्वात पक्षात प्रवेश केले.
मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर,डॉ.सोनल कोवे व तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांनी पक्षाच्या ध्येय धोरणाबाबत माहिती समजावून सांगितले व पक्षाच काम यापेक्षा अजून जोमाने वाढला पाहिजे याकरिता रीतसर मार्गदर्शन केले.
त्यावेळी जिल्हा सरचिटणीस लौकिक भिवापुरे,जिल्हाउपाध्यक्ष डॉ.नोमेश जुवारे,जिल्हासंघटन सचिव डॉ.हेमंत भाकरे,महिला जिल्हा कार्याध्यक्ष सारिका गडपल्लीवार, गडचिरोली शहराध्यक्ष अमोल कुळमेथे,महिला तालुकाध्यक्ष रुपाली दुधबावरे,जिल्हासचिव कपिल बागडे,पुरुषोत्तम खेडेकर,बंडू मेश्राम,संदीप सोयाम,अशोक बुर्ले,रमेश बुर्ले आदी कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते.
तर सर्व मान्यवरांचे तसेच सर्व कार्यकर्त्यांचे आभार व्येंकटेश बुर्ले यांनी मानले.
त्यानंतर बुर्ले परिवारांनी तयार केलेल्या आष्टी येथील भव्य अशा कार्यालयाची सर्व मान्यवरानी पाहणी केली व आमदार धर्मरावबाबा आत्राम सोबतच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते कार्यालयाचे उदघाटन करू असे आश्वासित करण्यात आले.