*महात्मा ज्योतिबा फुले यांची जिल्हा काँग्रेस कार्यालय गडचिरोली येथे जयंती साजरी*
गडचिरोली: सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातिव्यवस्थेचे निर्मूलन, आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य करणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती *जिल्हा काँग्रेस कार्यालय गडचिरोली येथे साजरी करण्यात आली.*
या प्रसंगी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे, महिला काँग्रेस अध्यक्ष ऍड. कविताताई मोहरकर, काँग्रेस शहर अध्यक्ष सतीश विधाते, उपाध्यक्ष जिल्हा काँग्रेस गडचिरोली शंकररावं सालोटकर, सहकार सेल अध्यक्ष अब्दुलभाई पंजवानी, तालुका अध्यक्ष वसंत राऊत, अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवहन जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, सोशल मीडिया सेल अध्यक्ष संजय चन्ने, शिक्षक सेल अध्यक्ष दत्तात्रय खरवडे, उत्तम ठाकरे,स्वप्नील बेहरे,रवींद्र चापले, चंद्रशेखर धकाते, जितेंद्र मुनघाटे, ढीवरू मेश्राम, महिला तालुका अध्यक्ष गडचिरोली कल्पना नंदेश्वर, पौर्णिमा भडके,रिता गोवर्धन,कविता उराडे, शालिनी पेंदाम,अशा मेश्राम,रंजना कुमरे,चित्रकला सहारे,सुधीर बांबोळे, लालाजी सातपुते सह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.