*काँग्रेस च्या आंदोलनाला यश ; गोसिखुर्द धरणातून वैनगंगा नदी पात्रात सोडणार 1 TMC पाणी*

14

*काँग्रेस च्या आंदोलनाला यश ; गोसिखुर्द धरणातून वैनगंगा नदी पात्रात सोडणार 1 TMC पाणी*

 

काँग्रेस विधिमंडळ गट नेते आमदार विजय वडेट्टीवार, खासदार डॉ नामदेव किरसान, आमदार रामदास मसाराम, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले होते पाणी सोडण्यासाठी सतत पाठवपुरावा

 

गडचिरोली ::  गडचिरोली – चंद्रपूर जिल्ह्यातील नदी काटावरील गावात वाढत चाललेली पिण्याच्या पाण्याची टंचाई, शेती करीता होत असलेली पाण्याची मागणी लक्ष्यात घेऊन  मागील काही दिवसापूर्वी (दिनांक 5 एप्रिल 2025) रोजी, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात गोसिखुर्द धरनाचे पाणी वैनगंगा नदी पात्रात सोडण्यात यावे या प्रमुख मागणीला घेऊन वैनगंगा नदी पात्रात शेकडो शेतकऱ्यासह ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात स्वतः काँग्रेस विधिमंडळ गट नेते आमदार विजयभाऊ वडेट्टीवार, गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव जी किरसान, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार रामदास जी मसराम यांनी उपस्थिती दर्शविली, राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन तसेच संबधीत विभागाचे मंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी सह इतर अधिकाऱ्यांकडे भ्रमनध्वनी व पत्रव्यवहाराच्या माध्यमातून पाठपुरावा केले असता, अंतिमता गोसिखुर्द धरणातून वैनगंगा नदी पात्रात 1 TMC पाणी सोडण्याला प्रशासनाने मंजुरी दिली आहे. दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता पासून गोसिखुर्द धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे.

या पाण्याच्या विसर्गाने गडचिरोली -चंद्रपूर जिल्ह्यातील नदीकाठावरील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा व शेतकऱ्यांच्या शेती करीता लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.