माना आदिम जमात मंडळच्या वतीने सामूहिक विवाह सोहळा उराडी येथे मोठ्या थाटामाटात सम्पन्न
कुरखेडा तालुक्यातील उराडी येथे विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले 12 एप्रिला सायंकाळी आदिवासी संस्कृती प्रमाणे आराध्यदैवताची मुठ पूजा करण्यात आले सर्व प्रथम माँ माणिकादेवी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले
मान्यवर उपस्थित होते
13 एप्रिला सकाळी ऍड वामनरावजी ननावरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले वाजत गाजत ढोलतासाच्या गजरात मोटारसायकलवर वरात काढण्यात आले विवाह रूढी,प्रथा,परंपरा टिकून राहण्यासाठी तसेच श्रम, आर्थिक बचत होण्यासाठी, कर्ज टाळण्यासाठी एकूण आठ वधू, वर दाम्पत्याचे विवाह गठबंधन करण्यात आले आदिवासी माना जमात संस्कृती प्रमाणे विवाह सम्पन्न झाले व शुभ आशीर्वाद देण्यात आले माँ माणिकादेवीच्या पटांगणात सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले
त्यावेळी कार्यक्रमाचे सोहळ्याचे अध्यक्षस्थानी माजी आमदार कृष्णाजी गजबे उपस्थित होते व मार्गदर्शन केले उदघाटक वासुदेवजी धारणे, सत्कारमूर्ती खासदार डॉ नामदेवजी किरसान, जिल्हा अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, सामाजिक जेष्ठ कार्यकर्ते बाळकृष्ण सावसाकडे यांनी विचार व्यक्त केले त्यावेळी मंचावर ,प्रदीप बोडणे, पत्रुजी घोडमारे,भाऊरावजी ननावरे,डॉ राकेशजी दडमल, सुरेश रंदये,चंद्रकांत चौके,गोविंदराव सावसाकडे,अरविंदजी सांदेकर,मधूकरजी ढोक, प्रेम धोबे, गोविंदराव चौधरी, गिरीधरजी ननावरे,रमेश राणे,भरत राणे ,राधेश्याम दडमल, गज्जनन चौधरी, ऍड अरुण ननावरे,पंढरीजी रंदये,रोशन रंदये आदी मंचावर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुणवंतजी दडमल यांनी केले सूत्रसंचालन सुरेश चौधरी यांनी केले,आभार भास्कर दडमल यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुरखेडा तालुका तसेच उराडी ग्रामवासीय यांनी अथक परिश्रम घेतले हजारो च्या संख्येने माना समाज बांधव तसेच वऱ्हाडी उपस्थित होते