*फुलनार चकमक चौकशीसंदर्भात निवेदन आमंत्रित*
गडचिरोली, (जिमाका) दि.16 : फुलनार जंगल परिसरात दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीदरम्यान पोलीस जवान महेश कवडू नागुलवार शहीद झाले होते. या घटनेतील मृत्यूच्या कारणांचा शोध घेणे आवश्यक असल्याने, सदर प्रकरणात दंडाधिकारी चौकशी करण्यात येत आहे.
तरी या घटनेची प्रत्यक्ष माहिती असणाऱ्या आणि चौकशीमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी आपले लेखी निवेदन शपथपत्रासह उपविभागीय दंडाधिकारी, एटापल्ली यांच्याकडे 15 दिवसांच्या आत किंवा तत्पूर्वी कार्यालयीन वेळेत सादर करावे, असे आवाहन उपविभागीय दंडाधिकारी, एटापल्ली तथा सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल यांनी केले आहे.