*आधार नोंदणी संचासाठी अर्ज आमंत्रित*

25

*आधार नोंदणी संचासाठी अर्ज आमंत्रित*

 

गडचिरोली, दि. 21 एप्रिल 2025: जिल्ह्यात आधार नोंदणी आणि बायोमेट्रीक अद्ययावतीकरण सेवांचा विस्तार करण्यासाठी, विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागात आधार सेवा सुलभ करण्याच्या उद्देशाने, माहिती तंत्रज्ञान संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयास आधार नोंदणी संच प्राप्त झाले आहेत. या उपक्रमांतर्गत, जिल्ह्यातील रिक्त असलेल्या 31 महसूल मंडळ क्षेत्रांमध्ये आधार नोंदणी संच वितरित करण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र (महा-ई सेवा केंद्र) चालकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. आधार नोंदणी सेवा केंद्रांसाठी जाहीरात, रिक्त 31 महसूल मंडळ क्षेत्रांची यादी आणि अर्जाचा नमुना जिल्ह्याच्या संकेतस्थळावर (www.gadchiroli.gov.in) उपलब्ध आहे. इच्छुक आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी 18 एप्रिल 2025 ते 28 एप्रिल 2025 या कालावधीत, सकाळी 11:00 ते सायंकाळी 6:00 या वेळेत, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथील सेतू शाखेत विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.