काँग्रेस चे देऊळगाव येथे 1 तास चक्काजाम ; नियमित वीज पुरवठा, रानटी हत्तीचा बंदोबस्त करण्यासह इतर मागण्यांचा समावेश
काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, आमदार रामदास मसराम सह मोठ्या संख्येने शेतकरी, महिला युवकांची उपस्थिती
गडचिरोल:: गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांचा व्यवसाय हा शेतीवर अवलंबून आहे मात्र शेतीला विजपुरवठा खंडित करण्यात येत आहे, या संदर्भात विजपुरवठा नियमित करण्यात यावा तसेच रानटी हत्तीनी मोठी धुमाकूळ घातली असून त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा म्हूणन वारंवार मागणी होत असताना देखील अजून पर्यंत शासनाने कुठल्याही प्रकारची ठोस पावले उचलली नसल्याने गडचिरोली जिल्हा काँग्रेस च्या वतीने 22 एप्रिल रोजी,गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात व आमदार रामदास मसराम यांच्या प्रमुख उपस्थितीत देऊळगाव येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
यावेळी माजी जि.पं.उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, . जि.प. माजी उपाध्यक्ष तथा कुरखेडा तालुकाध्यक्ष जीवन पा. नाट,महिला जिल्हाध्यक्ष ऍड. सौ. कविता मोहरकर, शहराध्यक्ष सतीश विधाते, तालुकाध्यक्ष आरमोरी मिलिंद खोब्रागडे, वडसा राजेंद्र बुल्ले, कोरची मनोज अग्रवाल, धानोरा प्रशांत कोराम, गडचिरोली वसंत राऊत, अहेरी डॉ. अब्दुल निसार हकीम, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस नितेश राठोड,माजी सभापती परसराम टिकले, माजी उपसभापती नितीन राऊत, जिल्हा काँग्रेस चे जेष्ठ नेते शँकरराव सालोटकर, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, जिल्हा उपाध्यक्ष जयंत हरडे, प्रभाकर वासेकर, अब्दुल पंजवानी, नंदूभाऊ नरोटे,रुपेश टिकले, संजय चने, हरबाजी मोरे, दिलीप घोडाम, शेरखान पठाण,रमेश चौधरी,अजाण विराणी,विपुल येलटीवार, विजय सुपारे, कैलास वानखेडे, पिंकूभाऊ बावणे,अक्षय साखरकर, शालिकराम पत्रे, भूपेश कोलते,उत्तम ठाकरे,जितेंद्र मुनघाटे, विश्वेश्वर दरो, वासिम शेख, गिरीधर तितराम,सिराज पठाण,लीलाधर भरे,कुणाल ताजने,गौरव येणप्रेडीवार, जावादे खान, सुमिताताई रायपुरे,अपर्णाताई खेवले,रिताताई गोवर्धन,कल्पनाताई नंदेश्वर,रुंदाताई गजभे,वैष्णविताई आकरे,रंजनीताई आत्राम,रुपलता ताई बोदेले सह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, महिला, युवक यावेळी आंदोलनात उपस्थित होते.
आंदोलकांनी नागपूर -गडचिरोली महामार्गवरील 1 तास वाहतूक अडवून चक्का जाम केले, प्रशासनाच्या वतीने सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला, मागण्या पूर्ण न झाल्यास या पेक्षा आणखी जास्त तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिला आहे.
आंदोलनातील इतर मागण्या
◆विद्युत मीटर करिता डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना अजून पर्यंत विद्युत मीटर मिळाले नाही किंवा त्या जागी सोलर पंप सुद्धा मिळाले नाही.
◆ शेतकरी आणि लोकप्रतिनिधीकडून वारंवार विरोध होत असताना सुद्धा शासनाने विमानतळाकरीता पुलखलं परिसरातील सुपीक शेत जमीन अधिग्रहित करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे ते त्वरित थांबवावे व शेतकऱ्यांशी चर्चा करावी.
◆ चामोर्शी भेंडाळा परिसरातील एमआयडीसी करिता अधिग्रहीत करण्यात येणाऱ्या शेतजमिनीचे दर वाढवून देण्यात यावे व शेतकऱ्यांशी चर्चा करूनच जमीन अधिग्रहित करण्यात यावे.
◆जिल्ह्यात शासकीय धान खरेदी विक्री केंद्रावर व राईस मिल मध्ये वारंवार धान घोटाळ्याचे प्रकरण उघड केस येत आहे त्यामुळे ह्या दान घोटाळ्यावर आळा घालण्याकरिता उच्चस्तरीय समितीद्वारे चौकशी करून दोशींवर कडक कारवाई करण्यात यावी.
◆ धानाला बोनस जाहीर करण्यात यावा.
◆शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी.
◆ घरकुल करिता रेती उपलब्ध करून देण्यात यावे.
◆मनरेगा अंतर्गत प्रलंबित असलेले थकीत पैसे त्वरित देण्यात यावे.
◆ जिल्ह्यातील प्रलंबित असलेले राष्ट्रीय महामार्ग व इतर रस्त्याचे काम मान्सून पूर्व तातडीने पूर्ण करावे.
◆जिल्ह्यातील विविध विभागात अनेक पदे रिक्त आहेत त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांची कामे खोडंबतात त्यामुळे रिक्त असलेली पदे तातडीने भरण्यात यावे.