सरकारी कामात अडथळा निर्माण करणाया आरोपीस 2 वर्षे कारावास व 20,000 रु. द्रव्यदंडाची शिक्षा
* दंड न भरल्यास 6 महिने वाढीव शिक्षेची तरतूद
* गडचिरोली येथील मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. विनायक आर. जोशी यांचा न्यायनिर्णय
सविस्तर वृत्त असे की, यातील फिर्यादी नामे – प्रविण विश्वनाथ तलांडे, वय 39 वर्षे, धंदा–नोकरी (एस.टी. चालक) रा. गडचिरोली जि. गडचिरोली यांनी पोस्टे चामोर्शी येथे तोंडी रिपोर्ट दिली की, दिनांक 09/03/2019 रोजी एस.टी. बस क्र. एम.एच.-06-सी-8843 या बसने सोबत वाहक रविंद्र सुधाकर पुज्जलवार यांचे सह घोट येथे जाऊन तिथून चामोर्शी ते गोंडपिपरी, भेंडाळा, गणपूर मार्गे गोंडपिपरी मुक्काम करिता भेंडाळा गणपूर येथून जात असताना लोकमान्य टिळक विद्यालय, गणपूर शाळेसमोर बोरी-गणपूर जाणाया मार्गावर एक इसम आरोपी नामे-सुनिल कोहपरे याने आपल्या ताब्यातील मोटार सायकल ही बस जाणाया रोडच्या मध्यभागी उभी ठेवून बसचे वाहन चालक यांना म्हणत होता की, “माझी गाडी ही बंद पडली आहे, मी काढू शकत नाही” म्हणून फिर्यादी सोबत अरेरावी करुन शिविगाळ करीत होता. तेव्हा फिर्यादी याने आरोपीच्या गाडीला रस्त्याच्या बाजूला करतो म्हणून गाडीला हात लावले असता, यातील आरोपी याने फिर्यादी चालक याचे कॉलर पकडून फिर्यादीला खूप शिविगाळ करुन वाहन चालकाला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन आपल्या खिशातून चाकू फिर्यादी चालक यांच्यावर दोन तिन वेळा वार करण्याचा प्रयत्न केला. पण फिर्यादी चालक यांनी आपले जीव वाचविण्यासाठी प्रतिकार केला असता, सदरचा चाकू फिर्यादी चालक यांच्या उजव्या मांडीवर लागून रक्तबंबाळ होऊन दुखापत झाली होती. त्यावेळी वाहक नामे रविंद्र पुज्जलवार आणि बसमधील प्रवासी यांनी मिळून फिर्यादी चालक यांस प्राथमिक आरोग्य केंद्र गणपूर रै. येथे प्राथमिक उपचार करुन पुढील उपचाराकरीता ग्रामीण रुग्णालय, चामोर्शी येथे भरती केले होते.
फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरुन पोलीस स्टेशन, चामोर्शी येथे दिनांक 10/03/2019 रोजी अप. क्र. 48/2019 कलम 353, 332, 324, 341, 504, 506 भादंवि अन्वये गुन्हा नोंद करुन आरोपीस दिनांक 29/03/2019 रोजी रात्री 19:07 वा. अटक करुन आरोपी विरुद्ध सबळ पूरावा मिळून आल्याने तपास पूर्ण करुन मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करुन सेशन केस क्र. 115/2019 नूसार खटला मा. सत्र न्यायालयात चालवून फिर्यादी, पंच व साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद मा. न्यायालयाने ग्राह्र धरुन दिनांक 22/04/2025 रोजी मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, गडचिरोली श्री. विनायक आर. जोशी यांनी आरोपी नामे सुनिल जनार्धन कोहपरे, वय 35 वर्षे, रा. गणपूर, तह. चामोर्शी जि. गडचिरोली यास कलम 341, 324, 504, 506, 332, 353 भादंवि मध्ये दोषी ठरवून एकूण दोन वर्षे सश्रम कारावास व 20,000 रु. द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली तसेच 20,000 रु. दंडाची रक्कम ही जखमी फिर्यादीस देण्याचा आदेश पारित करण्यात आला.
सरकारी पक्षातर्फे सहा. जिल्हा सरकारी वकील श्री. सचिन यु. कुंभारे यांनी कामकाज पाहिले. तसेच गुन्ह्राचा तपास परि.पोउपनि. दिनेशकुमार रामेश्वर लिल्हारे यांनी केला. तसेच संबंधीत प्रकरणात साक्षीदारांशी समन्वय साधून प्रकरणाची निर्गतीकरिता कोर्ट पैरवी अधिकारी पोनि. चंद्रकांत वाभळे, श्रेणीपोउपनि. शंकर चौधरी, सफौ/2824 सागर मुल्लेवार यांनी कामकाज पाहिले.