महाराष्ट्र राज्याने प्रतिबंधित केलेल्या सु्गंधित तंबाखूची अवैधरित्या वाहतूक करणा-या दोघांवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

21

 

महाराष्ट्र राज्याने प्रतिबंधित केलेल्या सु्गंधित तंबाखूची अवैधरित्या वाहतूक करणा-या दोघांवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

 

* सुगंधित तंबाखू व चारचाकी वाहनसह एकूण 09 लाख 24 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

 

महाराष्ट्र शासनाने सुगंधित तंबाखू विक्री व वाहतुकीवर प्रतिबंध केला आहे. गडचिरोली जिल्ह्रात देखील सुगंधित तंबाखूची वाहतूक करणा­यांवर अंकुश बसावा या उद्देशाने पोलिस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी गडचिरोली जिल्ह्रातील प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, अवैध दारु, जुगार व ईतर अवैध व्यवसायांवर प्रभावीपणे कायदेशीर कारवाई करण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविली आहे.

 

दिनांक 22/04/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गस्तीदरम्यान गोपनिय माहिती मिळाली की, अर्जूनी – देसाईगंज मार्गे चारचाकी वाहनाने मोठ¬ा प्रमाणात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू देसाईगंज हद्दीतील चिल्लर तंबाखू विक्रेत्यांना पुरवठा करण्यात येणार आहे. सदर खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मौजा अर्जुनी ते देसाईगंजकडे जाणा¬­या रस्त्यावर सापळा रचला असता, संशयीत सिल्व्हर रंगाची टोयोटा कंपनीची ईनोव्हा चारचाकी वाहन येत असताना दिसून आल्याने सदर वाहनाला तात्पुरता अडथळा निर्माण करुन वाहन थांबविण्यात आले. त्यानंतर वाहन चालकाचे नाव व पत्ता विचारले असता, त्यांनी त्याचे नाव अस्पाक मुन्ना शेख, वय 25 वर्ष, रा. संजयनगर पिंडकेपार, जि. गोंदिया असे सांगितले. यानंतर पोलीसांनी वाहन चालक व पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली असता, वाहनात 5,44,304/- रुपये किंमतीची अवैध सुगंधित तंबाखू मिळून आली. वाहन चालकास सुगंधित तंबाखूबाबत विचारपूस केली असता, त्याने सदरची सुगंधित तंबाखू ही गोंदिया येथील रवी मोहनलाल खटवानी याची असल्याचे सांगितले. यावरुन वाहनातील 5,44,304/- रुपये किंमतीची सुगंधित तंबाखू व सुगंधित तंबाखू वाहून नेण्याकरिता वापरात आणलेली 3,80,000/- रुपये किंमतीची इनोव्हा चारचाकी वाहन क्र. एम.एच.-15-बी.एन.-5689 असा एकूण 9,24,304/- रुपये किंमतीचा मुद्देमाल गडचिरोली पोलीसांनी जप्त केला आहे.

 

याबाबत अन्न व औषध प्रशासन विभाग, गडचिरोली यांनी पोलीस स्टेशन देसाईगंज येथे आरोपी (1) अस्पाक मुन्ना शेख, वय 25 वर्ष, रा. संजयनगर पिंडकेपार, जि. गोंदिया (2) रवी मोहनलाल खटवानी, रा. गोंदिया जि. गोंदिया यांचेविरुध्द अपराध क्रमांक 188/2025 कलम – 3(5), 275, 274, 223, 123 भारतीय न्याय संहिता-2023 सहकलम – 59(i), 3(1)(zz)(iv),27(3)(e),26(2)(i) अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम-2006 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून, गुन्ह्राचा पुढील तपास सपोनि. संदिप आगरकर, पोस्टे देसाईगंज हे करीत आहेत.

 

सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम.रमेश यांचे मार्गदर्शनात स्थागुशाचे पोलीस निरीक्षक श्री. अरुण फेगडे यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या मपोउपनि. सरीता मरकाम, पोहवा/दिपक लेनगुरे, प्रेमानंद नंदेश्वर, पोअं/सचिन घुबडे, निशीकांत अलोणे, निकेश कोडापे यांनी पार पाडली.