*महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची सहविचार सभा गडचिरोलीत उत्साहात संपन्न*
गडचिरोली (२४ एप्रिल) : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, जिल्हा गडचिरोलीच्या सहविचार सभेचे आयोजन दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी विदर्भ इंटरनॅशनल स्कूल, गडचिरोली येथे करण्यात आले. या सभेच्या अध्यक्षस्थानी *मा. वासुदेव भुसे*, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), गडचिरोली होते. कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून *मा. नागो गाणार*, माजी शिक्षक आमदार व राज्य कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांनी उपस्थित राहून उपस्थितांना विधायक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात सौ. पुजाताई चौधरी (राज्य महिला आघाडी प्रमुख), श्री. सुभाष गोतमारे (कार्यवाह, नागपूर विभाग), श्री. संतोष सुरावार (विभाग कोषाध्यक्ष), मा. बाबासाहेब पवार (शिक्षणाधिकारी, प्राथमिक), श्री. विवेक नाकाडे (उपशिक्षणाधिकारी व वेतन अधीक्षक), श्री. गेडाम साहेब, श्री. साळुंके (लेखाधिकारी), श्री. अनिल कंठावार (जिल्हाध्यक्ष, माध्यमिक), श्री. संतोष जोशी (जिल्हाध्यक्ष, प्राथमिक) यांच्यासह विविध पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेच्या प्रारंभी मा. नागो गाणार सर यांचा शाल, पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सहा तास चाललेल्या या चर्चासत्रात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ३० सामूहिक व १४ वैयक्तिक समस्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. श्री. संतोष सुरावार यांनी समस्यांची नियमबद्ध मांडणी करून संबंधित अधिकाऱ्यांशी खुल्या चर्चेत मार्ग काढण्याचा प्रयत्न केला.
मा. नागो गाणार सर यांनी शिक्षण क्षेत्रातील नियम, कायदे आणि प्रशासनातील दिरंगाई यावर मार्मिक उदाहरणांसह मार्गदर्शन केले. यानंतर उपस्थित अधिकाऱ्यांनी समस्यांचे गांभीर्य ओळखून तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी मा. शिक्षणाधिकारी माध्यमिक श्री. भुसे यांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक प्रयत्नशील होण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची सहविचार सभा ही खरोखरच मार्गदर्शक ठरते.त्यामुळे अशी सहविचार सभा दर तीन महिन्यांनी घेण्यात येईल असे मनोगत व्यक्त केले.
सभेस गोपाल मुनघाटे, जीवन ऊईके, विश्वजीत लोणारे, दिलीप तायडे, इम्रान पठाण,श्री साळवे जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी, सर्व तालुका अध्यक्ष- कार्यवाह शिक्षक प्रतिनिधी, तसेच वेतन अधिक्षक व शिक्षण विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी श्री. सागर आडे (जिल्हा कार्यवाह) यांनी उपस्थितांचे आभार मानले.