शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने मा.शिक्षणाधिकारी श्री बाबासाहेब पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन,निवेदन देऊन चर्चा केली*

28

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा गडचिरोली* 👉 *गडचिरोली जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विवीध प्रलंबित समस्या संदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा गडचिरोली चे जिल्हाध्यक्ष श्री रघुनाथ भांडेकर सर यांचे नैतृत्त्वात शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने मा.शिक्षणाधिकारी श्री बाबासाहेब पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन,निवेदन देऊन चर्चा केली* दिनांक-24/04/2025. 👉 निवेदनात. ▪️उन्हाळी कालावधीतील माहे मे व जून या दोन महिन्यांचा प्रोत्साहन भत्ता व वाहतुक भत्ता नियमित देण्यात यावे. ▪️ जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत कार्यरत पात्र शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणीचा लाभ त्वरीत देण्यात यावे. ▪️4 टक्के सादील अनुदान जिल्हा परिषद शाळांना त्वरीत अदा करण्यात यावा. ▪️जुलै 2024 पासुनची 3 टक्के महागाई ची थकबाकी त्वरीत अदा करण्यात यावी. ▪️ आंतरजिल्हा बदलीने जिल्हा परिषद गडचिरोली येथे आलेल्या शिक्षकांना एक आगाऊ वेतनवाढ देण्यात यावी. ▪️01/11/2005 पूर्वी पदभरतीच्या जाहिरात द्वारे 01/11/2005 रोजी किंवा त्या नंतर शासन सेवेत रूजू झालेल्या शिक्षकांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात यावी. ▪️ निवडश्रेणी मंजूर झालेल्या शिक्षकांची थकबाकी त्वरित काढण्यात यावी. ▪️ वित्तीय वर्ष 2024-25 चे G.P.F.च्या पावत्या त्वरीत उपलब्ध करून देण्यात यावे. ▪️B.L.O.सह इतर अशैक्षणिक कामे शिक्षकांकडून काढण्यात यावे. यासह विवीध प्रलंबित मागण्यांचा समावेश निवेदनात होता. 👉याप्रसंगी निवेदन देतांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री रघुनाथ भांडेकर सर, कास्टाईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री चक्रपाणी कन्नाके सर,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस श्री अशोक रायसिडाम सर,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाकोषाध्यक्ष श्री राजेश चिलमवार सर,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा सहसरचिटणीस श्री लोमेश उंदिरवाडे सर, कास्टाईब शिक्षक संघटनेचे सरचिटणीस श्री डाॅ.दिवाकर नारनवरे सर, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका चामोर्शी चे युवा आघाडी तालुकाध्यक्ष तथा जुनी पेन्शन संघटना तालुका चामोर्शी चे सरचिटणीस श्री सुजित दास सर आदी मान्यवर उपस्थित होते.