*आदिवासी लाभार्थी मेळाव्यात आ.धर्मराव बाबा आत्राम यांची उपस्थिती*

17

*आदिवासी लाभार्थी मेळाव्यात आ.धर्मराव बाबा आत्राम यांची उपस्थिती*

 

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अहेरी द्वारा आयोजित आदिवासी लाभार्थी मेळाव्यात अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

वासवी सेलिब्रेशन हॉल मध्ये राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांच्या हस्ते मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले.यावेळी विविध लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.यावेळी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचा लाभ देण्यात आला. शेती अवजारे वाटप, प्रशिक्षित उमेदवारांना अर्थसहाय्य तसेच विद्यार्थ्यांना सायकल वाटप अशा विविध योजनांचा लाभ देण्यात आला तसेच लाभार्थ्यांना प्रत्यक्ष दनादेश देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

 

विशेष म्हणजे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी न्यूक्लिअस बजेट अंतर्गत आदिवासी समाजाच्या कौशल्य विकासासाठी उपयुक्त योजना राबवून रोजगार निर्मितीला चालना देण्याचे आवाहन केले.