*यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेतील लाभार्त्याना निधीचे वितरण करा ; काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांची मागणी*
*अन्यथा घरकुल लाभार्यांना घेऊन समाज कल्याण कार्यालयाला घेराव घालण्याचा ईशारा*
गडचिरोली :: अन्न, वस्त्र व निवारा या मानवाच्या प्राथमिक गरजा आहेत, मात्र गडचिरोली सारख्या अतिदुर्गम जिल्ह्यातील अनेक गरजू व गरीब लोकांना हक्काचे पक्के घर नाही, देशाचे प्रधानमंत्री प्रचारात 2022 पर्यंत सर्वांना पक्के घर देणाचे वचन देतात मात्र 2025 वर्ष आले तरी अजून पर्यंत अनेक नागरिकांना हक्काचा घर मिळाले नाही.
यशवंतराव चव्हाण घरकुल योजना अंतर्गत 2024 मध्ये गडचिरोली जिल्ह्याकरीता 440 घरकुल मंजूर झाले मात्र घरकुल लाभार्त्यांना अजून पर्यंत लाभाचे हप्ते वितरित करण्यात आले नाही. घरकुल मंजूर झाले असल्याने अनेक लाभार्त्यांनी आपले जुने कच्चे घर फोडून तात्पुरत्या निवासाची व्यवस्था केली, आता पुढच्या दोन महिन्यावर मानसून सुरु होणार आहे मात्र लाभार्त्यांना अजून पर्यंत लाभाचे हप्ते जमा न झाल्याने अनेक लाभार्थी चिंतेत आले असून घराचे काम सुरु न केल्यास त्यांचे संसार उघड्यावर येण्याची शक्यता असून यशवंतराव चव्हाण घरकुल योजना अंतर्गत घरकुलच्या प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांना तातडीने निधीचे वितरण करण्यात यावे. अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली आहे. 8 दिवसाच्या आत निधीचे वितरण न झाल्यास घरकुल योजनेतील लाभार्त्याना घेऊन समाज कार्यालयाला घेराव घालण्याचा ईशारा गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिला आहे.