गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नांनी स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर प्रथमच कटेझरी ते गडचिरोली बससेवा सुरु

10

 

गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नांनी स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर प्रथमच कटेझरी ते गडचिरोली बससेवा सुरु

 

श्व् नागरिकांनी वाजत गाजत केले बसचे स्वागत

 

गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहूल व माओवादग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. जिल्ह्रातील दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणा­या नागरिकांसाठी प्रवासाचे साधन उपलब्ध नसल्याने त्यांना पायपीट करत प्रवास करावा लागत असतो. अशा दुर्गम भागातील नागरिकांचे जगणे सुसह्र व्हावे यासाठी गडचिरोली पोलीस दलाकडून विविध उपक्रम राबविले जात असतात. याच वर्षी 01 जानेवारी 2025 रोजी गट्टा ते गर्देवाडा व त्यापुढे वांगेतुरी बस सेवा देखील सुरु करण्यात आली असून दुर्गम भागात मागील पाच वर्षांमध्ये 434.53 कि.मी. लांबीच्या एकूण 18 रस्त्यांसोबतच एकूण 59 पुलांचे बांधकाम पोलीस संरक्षणात पूर्ण करुन घेण्यात आले आहे. याप्रमाणेच अतिदुर्गम कटेझरी येथील नागरिकांना प्रवासाचे साधन उपलब्ध होऊन त्यांना तहसिल किंवा जिल्ह्राच्या ठिकाणी सहज प्रवास करता यावा यासाठी काल दिनांक 26/04/2025 रोजी गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नाने व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, गडचिरोली यांच्या सहकार्याने मौजा कटेझरी ते गडचिरोली अशी बससेवा स्वातंत्र्यानंतर प्रथमच सुरु करण्यात आली.

 

गावात स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर प्रथमच बस आल्यामुळे भागातील नागरिकांनी वाजत गाजत बसचे स्वागत केले. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. जगदीश पांडे यांनी सदर बस सेवेचे उद्घाटन केले व गावक­यांना मार्गदर्शन केले. तसेच यावेळी पोलीस स्टेशन कटेझरी येथील प्रभारी अधिकारी पोउपनि. अजय भोसले यांनी हिरवा झेंडा दाखवून बस मार्गस्थ केली. या बस सेवेमुळे आजूबाजूच्या 10 ते 12 गावांना लाभ होणार आहे. बससेवा सुरु झाल्यामुळे गावातील विद्याथ्र्यांना शिक्षणाची सोय होणार आहे. यामुळे गावातील नागरिकांचीही नेहमीची पायपीट वाचणार आहे. सदर मार्गावरील एस.टी बसच्या सुविधेमुळे गावक­यांना वर्षभर सहज प्रवास करता येईल, तसेच पोलीस व जनता यांचे संबंध आणखी मजबूत होण्यास मदत होईल.

 

पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, धानोरा श्री. जगदीश पांडे, पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे कटेझरी येथील पोउपनि. अजय भोसले व अधिकारी आणि अंमलदार यांच्या प्रयत्नांनी सदर उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.