विटा भट्टीची नासधुस व विटांची चोरी करणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यावर कारवाहीची मागणी
एटापल्ली:- तालुक्यातील जीवनगट्टा येथील शेतकऱ्यांच्या शेतातील विटा भट्टीची वनपरिक्षेत्र अधिकारी संजुदास राठोड व काही कर्मचाऱ्यांनी नासधुस करून चार हजार वीटा चोरी केल्याने चौकशी करून फौजदारी कारवाहीच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी दीपक सिंघला यांना पाठविन्यात आले आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी संजुदास राठोड, वनरक्षक पोरेटी व इत्तर तीस कर्मचाऱ्यांनी दिनांक 15 मार्च रोजी मौजा जीवनगट्टा येथील शेतकरी बळवंत सुरजागड यांच्या शेतातील वीटाभट्टीची नासधुस करून चार हजार वीटा चोरी केल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. सदर विटाभट्टीचे शेतमालक बळवंत सुरजागडे यांचे कनिष्ठ बंधु बाबूराव सुरजागडे यांचे मृत्यु झाल्याच्या दिवशी विटाभट्टी असलेल्या शेताच्या शेजारी अंत्यविधि सुरु असतांना वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड व काही कर्मचारी विटभट्टीच्या ढिगावर चढून संपूर्ण वीटा खाली फेकून नासधुस केले असल्याचे निवेदनातून म्हटले आहे, यावेळी अंत्यविधित सामील नागरिक वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड व इतर कर्मचाऱ्यांचा विटभट्टीची नासधुसीचा तांडव मुखपने पाहत होते, कनिष्ठ भावाच्या निधनाचे दुखात असलेले सुरजागडे परिवार व त्यांचे नातेवाहिक यावेळी काहीही प्रतिक्रिया देऊ शकले नाही, असेही निवेदनातून नमूद केले आहे,
सदर प्रकारणाची तक्रार एटापल्ली पोलिसांकड़े केली असता पोलिसांनीही वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड व इतरांवर कोणतीही कारवाही करू शकत नसल्याचे सांगितले असल्याने गरीब शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची विनंती नायाब तहसीलदार जनकचक्रवर्ती काळबाजीवार यांचे मार्फत जिल्हाधिकारी दिपक सिंघला यांना पाठविलेल्या निवेदनातून शेतकरी बळवंत सुरजागडे, महेंद्र वासेकर, शिवसेना जिल्ह्य प्रमुख प्रमुख राजगोपाल सुल्वावार, पंचायत समिती सदस्य बेबी लेकामी, अनिल करमरकर, सरपंच राजू नरोटे, विनोद सिडाम, आकाश पेंदाम, सुमित्रा सिडाम, नानाजी गावड़े, लक्ष्मी आत्राम, शशिकला आत्राम, श्यामसुंदर नैताम, अशोक नैताम, यादव नैताम, रंजीत जुमनाके, आशीष कोसरे, घनश्याम नैताम, रविन्द्र नैताम, राष्टवादी काँग्रेस तालुका संघटन सचिव प्रा. विनोद पत्तिवार, विलास चिटमलवार, राकेश तेलकुंटलवार, राघव सुल्वावार, शैलेश आकुलवार, सचिन मोदकुलवार, किशोर चंडकापूरे, लक्ष्मण नरोटे, पंकज कुंभारे, प्रभु कुंभारे, ईश्वर पदा व बंडू मडावी यांनी केली आहे,