13 विद्यार्थी कोरोना पॉसिटीव्ह आल्याने जिल्यातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ..

311

कोरची येतील घटना

  1. कोरची दि.11/01/2021:-केंद्र व राज्य सरकारने पालकांच्या संमती पत्र घेऊन इयत्ता नववी ते बारावीपर्यंतची शाळा सुरू करण्याची परवानगी दिली खरी; पण कोरोनाचा पादुर्भाव अजूनही कमी झाल्याचे दिसून येत नाही. कोरची तालुक्यातील चार शाळांमधील १३ विद्यार्थिंनींची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटीव्ह आल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे.
    कोरची येथील पारबताबाई विद्यालय, बेतकाठी येथील धनंजय स्मृती विद्यालय ,कोरची येथील निवासी शासकीय आश्रम शाळेत तर कोरची येथीलच श्रीराम विद्यालय च्या विद्यार्थिनी आहेत.राज्य शासनाच्या निर्देशानुसार 23 नोव्हेंबर पासून राज्यातील 9 वि ते 12 वि पर्यंत शाळा सुरू करण्यात आल्या असून त्याद्रुष्टीने शाळा निर्जंतुकीकरण, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती.
    आता विद्यार्थ्याची सुरक्षेच्या द्रुष्टीने सुध्दा विद्यार्थ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली त्यात पारबताबाई विद्यालयाच्या 5 , बेतकाठी येथील धनंजय स्मृती विद्यालयाच्या 6 , निवासी शासकीय आश्रम शाळा कोरची येथील 1 व श्रीराम विद्यालय कोरची येथील १ विद्यार्थिनी पाझीटिव्ह आल्याने शिक्षकांमध्ये व पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे
    कोरोणा चाचणीचा अहवाल शाळा प्रशासनास सादर करावयाचा असल्याने विद्यार्थ्याची कोरोना पाझीटिव्ह चाचणी करण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यास मार्गदर्शन करून चाचणी करिता प्रयूक्त केले होते . त्यामुळे विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आली.
    मात्र आरोग्य विभाग कमालीचे निष्क्रिय दिसत आहे. खबरदारी म्हणून येथील पारबताबाई विद्यालयातील 67 विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची आज पुन्हा आरटीपीसीआर टेस्ट घेण्यात आली. यापूर्वी या शाळेतील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची दि. 4 जानेवारी ला टेस्ट करण्यात आली होती. त्याची रिपोर्ट आज दि. 11 जानेवारी ला मिळाली. या आठ दिवसात हे विद्यार्थी घरातील सदस्यांसोबत वावरली.शाळेतील विद्यार्थी सोबत राहीली. त्यामुळे त्यांचा संसर्ग इतरांना झाला असावा. जर टेस्ट नमुना ताबडतोब प्रयोगशाळेत पाठवून वेळीच रिपोर्ट मिळाली असती तर हा संसर्ग पसरला नसता.
    येथील आरोग्य कर्मचाऱ्यांशी चर्चा केली असता, दवाखान्यात कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, 108 क्रमांकाची एकच गाडी असल्याने ती व्यस्त राहते. त्यामुळे गाडी वेळेवर उपलब्ध होत नाही. यामुळे शिक्षक आणि पालकांना रुग्णांना कोरोना सेंटरवर पोहोचवण्यासाठी पाठविले जाते.
    जिल्हा परिषद गडचिरोली चे मुख्य कार्यपालन अधिकारी आठ दिवसापूर्वी कोरची तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते, तेव्हा कधीही मुख्यालय न राहणारे सारे डाॅक्टर उपस्थित पाहून लोक अचंबित झाले होते.
    कोरोना संसर्गाच्या काळात तरी पूर्ण वेळ सेवा देने आवश्यक असतांना या तालुक्यातील बरेच डाॅक्टर उपस्थित राहतात नाही.