आज गडचिरोली जिल्ह्यात 48 नवीन कोरोना बाधित तर 41 कोरोनामुक्त

71

आज 48 नवीन कोरोना बाधित तर 41 कोरोनामुक्त

गडचिरोली,(जिमाका)दि.19 :- आज जिल्हयात 48 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 41 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 10068 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9659 वर पोहचली. तसेच सद्या 301 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 108 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.94 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 2.99 टक्के तर मृत्यू दर 1.07 टक्के झाला.
नवीन 48 बाधितांमध्ये गडचिरोलीतील 19, आरमोरी तालुक्यातील 7, भामरागड तालुक्यातील 8, धानोरा तालुक्यातील 6, एटापल्ली तालुक्यातील 2, कुरखेडा 2, तर वडसा तालुक्यातील 4 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 41 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 32, अहेरी 2, आरमोरी 3, चामोर्शी 1, धानोरा 1, तर वडसा मधील 2 जणांचा समावेश आहे.
नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील बाधितामध्ये सीआरपीएफ 1, प्रोजेक्ट कार्यालय आयटीआय डीपी 2, ग्रामसेवक कॉलनी 3, रीलायन्स पेट्रोलपंपच्या मागे 1, साईनगर 2, कन्नमवार वार्ड 1, महिला कॉलेजच्या जवळ 1, गोकुलनगर 2, शिवाजी हायस्कूल पोर्ला 1, झेडपी हायस्कूल 2, रामनगर 1, वसा 1, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये वैरागड 6, कुरंझा 1, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये पोस्ट ऑफीस 1, लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा 7, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये मालंदा 1, पवनी चवेला पीएचसी गोडलवाही 3, कारवाफा 2, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये विनोबा आश्रम शाळा, गेडा 2, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये रामगड 1, स्थानिक 1, वडसा तालुक्यातील बाधितामध्ये हनुमान वार्ड 2, फॉरेस्ट कॉलनी 1, तर इतर जिल्हयातील बाधितामध्ये 2 जणांचा समावेश आहे.