छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी DRG जवानांनी भरलेल्या बसला बॉम्बन उडवले.
23/03/2021:- या हल्ल्यात 5 जवान शहीद झाले असून, 8 गंभीर जखमी झाले आहेत. ब्लास्टदरम्यान बसमध्ये 24 जवान होते, त्यामुळे शहीदांची संख्या वाढू शकते. घटनेची माहिती मिळताच बॅकअप फोर्सला रवाना करण्यात आले आहे. हे सर्व जवान एका मोहिमेतून परत येत होते. या घटनेची पुष्टी DGP डीएम अवस्थी यांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील कडेनार परिसरातील धौडाई आणि पल्लेनारदरम्यान घणदाट जंगल आहे. नक्षलवाद्यांनी हिच संधी हेरली आणि बसजवळ IED ब्लास्ट केला. बसमधील सर्व जवान मंदोडाकडे जात होते.