आष्टी येथील ठाणेदाराणे केला पोलिस सिपायाच्या पत्नीचा विनयभंग …..! कुंपनच शेत खात म्हटल्यावर न्याय कोणाकडे मागायचा
गडचिरोली: सामान्य जनतेला सुरक्षित ठेवून खलवृतीने वागणार्यांना ठेवण्याचे काम पोलिसांनी करणे अपक्षीत आहे परंतु कुंपनच शेत खात म्हटल्यावर न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पती पत्नीचा कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी आपल्या ठाणेदारास वडीलधारी म्हणून आष्टी येथील पोलिस शिपायांने ठाणेदारास घरी पाचारण केले असता ठाणेदाराने कौटुंबिक भांडण सोडविण्याएवजी सिपायाच्या पत्नीचा हात धरून शरीरसुखाची मागणी केली व विनयभंग केल्याची तक्रार आष्टी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलिस शिपाई व त्याच्या पत्नीने गडचिरोलीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक समीर शेख यांचेकडे केली आहे.या घटनेमुळे पोलिस विभागात मोठी खळबळ उडाली आहे.पोलिस अधीक्षक कार्यलयात तक्रार नोंदविण्यासाठी पीडिता व तिच्या पतीचे आवश्यक बयान नोंदवून घेतले असुन चौकशी सुरू केली आहे.स्वतः पीडीतेनी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात बयान दिल्यानंतर समोरच प्रसिद्ध मादयमासमोर आपबिती सांगितली.
ठाणेदार जेव्हा दुपारी घरी आले तेव्हा पतीला घराबाहेर ठेवून तिचे एकटीसोबत बोलून तिला समज देतो असे सांगितले.आणि घरात आल्यानंतर काहीवेळ चर्चा केली. थोड्याच वेळात माझ्या हातावर आपला हात ठेवत त्यांनी शरीरसुखाची मागणी केली.मी नकार दिल्याने नंतर फोनवर बोलतो म्हणून बाहेर उभे असलेल्या माझ्या पतीला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेले.पती घरी आल्यावर मी त्यांना घडलेली हकीकत सांगितले त्यानंतर आम्ही तक्रार करायला आष्टी पोलिस स्टेशनमध्ये गेलो परंतु आपली कैफियत नोंदवून न घेता आम्हालाच धमकावले. त्यानंतर आम्ही घरी आलो व गडचिरोली पोलिस अधीक्षक कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला. व तयारी केली हे ठाणेदाराला कळताच काही पोलीस पाठवून आम्हाला जाण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला मात्र आम्ही आमच्या निर्णयावर ठाम राहत गडचिरोलीकडे रवाना झालो.यावेळी ठाणेदारांनी रस्त्यात आमची गाडी थांबवून माझ्या पतीला जबरदस्तीने गाडीतून उतरवून घेतले मी व माझे बाबा व सोबत काही लोक मिळून रात्री गडचिरोली पोलिस अधीक्षक कार्यालयात आलो.व आमची तक्रार नोंदवली.सकाळी माझ्या पतीला पोलिस अधीक्षक कार्यालयात बोलावून त्यांचेही बयान घेण्यात आले.आम्ही ठाणेदारावर गुन्हा दाखल करून त्यास अटक करावी अशी मागणी केली आहे.
या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही.मात्र अश्या घटनामुळे पोलीस प्रशासनाची मोठी बदनामी होत आल्याचे दिसून येत आहे