लग्न पत्रिका वाटपास निघालेल्या वधू पित्यावर काळाचा घाला

367

लग्न पत्रिका वाटपास निघालेल्या वधू पित्यावर काळाचा घाला

अपघातात वडील ठार आई गंभीर जखमी
केसलवाडा(वाघ) फाटा महामार्गावरील घटना

लाखनी ता.
मुलीच्या विवाह समारंभाच्या पत्रिका वाटपासाठी दुचाकीने निघालेले पती –पत्नी महामार्ग ओलांडताना सुसाट वेगाने येणार्‍या ट्रेलरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात पती ठार तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना केसलवाडा(वाघ) फाटा राष्ट्रीय महामार्ग क्र. ४६ वर शनिवारी (ता. २७ ) सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली. मृतकाचे नाव दिलीराम कवडू वाघाये वय ५२ तर संगीता दिलीराम वाघाये वय ४५ रा. केसलवाडा (वाघ) असे गंभीर जखमीचे नाव आहे.

वाघाये दाम्पत्य आपली स्प्लेंडर दुचाकी क्र. एमएच ३६ सी ९०१० ने केसलवाडा वरुण लाखनी कडे जात असताना केसलवाडा फाट्यावरून राष्ट्रीय महामार्ग ओलांडतांना लाखनी कडून भंडाराकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रेलर क्र. आरजे ०४ जेए ८३२२ ने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दिलीराम वाघाये यांचा डोक्यावरुन ट्रेलर चे चाक गेल्याने त्यांचा घटना स्थळीच मृतू झाला तर मागे बसलेली पत्नी संगीता ही हात व पायाचे हाड मोडल्याने गंभीर जखमी झाली.
अपघाताची माहिती केसलवाडा (वाघ ) परिसरात पसरताच घटना स्थळावर नागरिकांची गर्दी जमा झाली. जेएमसी कंपनी विरोधात तनावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती लाखनी पोलिसांना देण्यात आली. पोलिस निरीक्षक मनोज वाडिवे, स पो नि संजय कोरचे, पो.उप.नि अमोल तांबे, पो. हवा. भगवान थेर, दिगंबर तलमले, जतिन दासानी, पोलिस शिपाई अनिल राठोड यांनी घटनास्थळ गाठले. परिस्थिति नियंत्रणात आणून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविले. जमावाची अपघातग्रस्त कुटुंबाला जेएमसी कंपनीकडून आर्थिक मदतीची मागणी असल्यामुळे वृत्त लिहेपर्यंत गुन्हा दाखल केला गेला नसल्याने शवविच्छेदन करण्यात आले नव्हते.
पण अपघातात कारणीभूत ठरलेला ट्रेलर पोलिसांनी जप्त केला असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
तासाभरातच बुजविले खड्डे (चौकट)
केसलवाडा (वाघ) फाटा ते लाखनी स्मशानभूमी पर्यंत राष्ट्रीय महामार्गावर उड्डाण पुलाचे बांधकाम जे.एम.सी कंपनी मार्फत सुरू असल्याने वाहतूक सर्विस रोडने सुरू आहे. त्यामुळे ठीक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. दुरूस्ती बाबत अनेकांनी जेएमसी कडे मागणी केली. पण काही उपयोग झाला नाही अपघातात जिवीत हानी होताच तासभरातच सर्विस रोडवरील खड्डे तत्परतेने बुजविण्यात आल्याने या कंपनीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.