होळीच्या दिवशी मिर्ची तोडणी मजुरांवर काळाचा घाला.

5662

होळीच्या दिवशी मिर्ची तोडणी मजुरांवर काळाचा घाला.

आष्टी आलापल्ली मार्गावरील चंदनखेडीजवळ बस आणि पीक अप ची जोरदार धडक चार जण ठार तर 14 गंभीर जखमी

गडचिरोली
आज रविवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास आष्टी आलापल्ली मार्गावरील चंदन खेडी जवळ बस आणि पीक अप वाहनाची जोरदार धडक झाली यात चार जण ठार झाले.

मृतकामध्ये पीक अप चालक साई रमेश सुर्यदेवरा रा. नारायणबद्रा वय 22 वर्ष ता. कल्लूर जि. खम्मम,देवाजी खोकले रा आवळगाव ता.ब्रह्मपुरी जि. चंद्रपूर, अर्चना गोकुल आवारी रा हळदा ता ब्रम्हपुरी, नैना प्रभाकर निकुरे रा आवळगाव, ता ब्रम्हपुरी यांचा समावेश आहे.

सविस्तर वृत्त असे की आज दुपारच्या सुमारास आष्टीवरून अहेरी कडे जाणाऱ्या भंडारा अहेरी बस क्र.MH 40 y 5601 व विरुद्ध दिशेने आलापल्ली कडून आष्टीकडे येणाऱ्या पीक क्र.TS 04 UD 5840 यांच्यात जोरदार धडक झाली.चंद्रपूर जिल्ह्यतील ब्रम्हपुरी तालुक्यातील आवळगाव हळदा येथील मजूर मिर्ची तोडणीसाठी तेलंगाणा येथील खम्मम जिल्ह्यत गेले होते. ते तेलंगाणा येथील पीक अप वाहनाने होळी सणासाठी गावाकडे परत येताना हा दुर्दैवी अपघात झाला.पीक अप वाहनामध्ये एकूण पीक अप चालक,व क्लिनर सह 17मजूर होते. यापैकी चालक व एका मजुराचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोन मजुरांचा गडचिरोली रुग्णालयात नेताना मृत्यू झाला.14 मजूर व एका क्लिनर चा जखमीत समावेश आहे.

गंभीर जखमीमध्ये संतोष पुंडलिक मेश्राम वय 28 वर्ष रा. बोडधा ता. ब्रम्हपुरी
,ज्योती संतोष मेश्राम रा बोडधा ता. ब्रम्हपुरी,
मधुकर रेमाजी चूदरी वय 34 वर्ष रा बोडधा ता. ब्रम्हपुरी
,धनराज रेमाजी चूधरी वय 35 वर्ष रा. बोडधा ता. ब्रम्हपुरी,
प्रेमीला मधुकर चूधरी वय 35 वर्ष रा बोडधा,पुष्पा रेमाजी म्हस्के वय 36 रा. डोंगरगाव ता. सावली, , निराशा सुनील जुमनाके वय 40 रा. आवळगाव ता ब्रम्हपुरी, शुभम प्रभाकर निकुरे वय 36 रा आवळगाव, तानाबाई आवारी वय 50 रा.हळदा ता. ब्रम्हपुरी, अर्चना गोकुळ आवारी, रा हळदा, पुष्पा खोकले रा.आवळगाव, प्रशांत बंडू भोयर वय 28 रा. गेवरा ता सावली,सत्यम सुनील जुमनाके वय 18 रा आवळगाव, सुरेश माधवराव चित्तापारटी रा चेंनूर ता. कल्लूर जि. खम्म्मम यांचा समावेश आहे.
सदर अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय पंदिलवार,आष्टी पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार सखाराम बिराजदार, सहायक पोलिस निरीक्षक धर्मेंद्र मडावी,पोलीस उपनिरीक्षक जंगले पोलीस उपनिरीक्षक वैशाली कांबळे,सहायक फौजदार संघरक्षित फुलझेले, पोलीस शिपाई राजू पंचफुलीवार, पोलीस नाईक श्रीकांत कृपाकर पघटनास्थळी दाखल झाले. यावेळी पीक अप मधील जखमींना त्वरित आष्टी रुग्णालयात दाखल करण्यात आले.व नंतर जखमींना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले . यावेळी आलापल्ली आष्टी मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती व दोन्ही दिशेने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सामाजिक कार्यकर्ते संजय पंदिलवार यांनी स्वतःच्याजेसीबीच्या साह्याने अपघातग्रस्त वाहनांना बाजूला सारून वाहतूक सुरळीत करण्यात मोलाचे सहकार्य केले.

एन होळीच्या दिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे आवळगाव, व हळदा वासियावर शोककळा पसरली.