सिरोंचा मुख्यालयी आशा दिवस साजरा करण्यात आला.
सिरोंचा:- सिरोंचा येते आशा दिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामीण रुग्णालय सिरोंचा चे वैद्यकीय अधिक्षक डॉ अश्विन वलके यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोहर कनाके होते.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र अंकीसा डॉ शिरीष रंगुवार होते.
याप्रसंगी उपस्थित सर्व आशा आणि गटप्रवर्तकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
तसेच माहे एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 दरम्यान कोरोना संसर्ग काळात उल्लेखनीय कार्य केलेल्या आशा स्वयंसेविका सत्कार करण्यात आले तसेच आशांच्या सुप्त गुणांना वाव मिढावा यासाठी विविध स्पर्धाचे आयोजन करून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या आशा स्वयंसेविकांचे प्रशस्तीपत्र व शिल्ड देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन आर के एस के समुपदेशक कोविद कुमरे,कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका आशा समनवयक श्रीनिवास बुरम तर आभार श्री.रायसीडाम भाऊ यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.चंद्रकांत रामडूगवार आणि आशा व गटप्रवर्तक यांनी मोलाचे सहकार्य केले..