जिल्ह्याच्या विकास कामाविषयी मुख्य वनसंरक्षक याना शिवसेनेचे निवेदन

98

जिल्ह्याच्या विकास कामाविषयी मुख्य वनसंरक्षक याना शिवसेनेचे निवेदन

गडचिरोली :- मानकर साहेब मुख्य वनसंरक्षक कार्यालय गडचिरोली यांच्यासोबत गडचिरोली जिल्ह्यातील विकास कामाविषयी चर्चा करण्यात आली गडचिरोली जिल्ह्यामध्ये माननीय पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी विकासाकरता निधी उपलब्ध करून मंजूर केला परंतु वनविभागाच्या कायद्यामुळे विकास कामाला गती मिळत नाही हा जिल्हा नक्षलग्रस्त असून या जिल्ह्याचा अजून पर्यंत विकास झाला नाही परंतु आता बराच अशा कामांना मंजुरी मिळाली आहे व कामाला सुरुवात सुद्धा झाली आहे परंतु वनविभागाचे R F O तसेच D F O कामामध्ये अडथळा निर्माण करत आहे यांच्यामुळे काही कामे बंद पडल्याने जनतेमध्ये नाराजी पसरली आहे यापूर्वी नक्षलवादी विरोध करत होते परंतु आता काही प्रमाणात त्यांचा विरोध कमी झाला आणि आमच्या काही अधिकाऱ्यांचा विरोध सुरू झाला विशेष म्हणजे एटापल्ली तालुक्यातील आरे पो त्याचे उदाहरण आहे याबाबत मुख्य वनसंरक्षक कार्यालय गडचिरोली येथे मानकर साहेब यांच्यासोबत शिवसेना जिल्हाप्रमुख राजगोपाल सुलभावार, शिवसेना तालुकाप्रमुख अहेरी सुभाष शामराव घुटे अल्लापल्ली, राघव सुलभावार एटापल्ली शहर प्रमुख यांच्या वतीने निवेदन दिले