अत्यावश्यक सेवेसोबतच पूर्ण बाजारपेठ सुरु ठेवा- जिल्हा व्यापारी संघटनेचे
प्रशासनाने सोमवार ते शुक्रवार बाजारपेठ बंद ठेवण्याबाबत सुधारित आदेश काढावे
शासनाच्या शनिवार-रविवार च्या लॉकडाऊनला जिल्ह्यातील व्यापारी पूर्ण सहकार्य करणार
सोमवार ते शुक्रवार अत्यावश्यक सेवा वगळता पुर्ण बाजारपेठ बंद करण्याचा प्रशासनाचा आदेश सर्वसामान्य लोकांवर अन्याय करणारा
गडचिरोली,प्रतिनिधी :-
जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी सोमवार ते शुक्रवार अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठ बंद करण्याचा घेतलेला निर्णय लहान दुकानदार, कामगारांवर, व्यापारीवर्गावर अन्याय करणारा असल्याने सदर निर्णय मागे घेऊन सोमवार ते शुक्रवार किमान सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत बाजारपेठ सुरू ठेवावी तसेच प्रशासनाने सोमवार ते शुक्रवार बाजारपेठ बंद ठेवण्याबाबत सुधारित आदेश काढावे अशी मागणी गडचिरोली जिल्हा व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
याबाबतचे निवेदन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना दिले आहे. आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी शासनाला केली आहे. मागील वर्षी या कोरोना काळात झालेल्या अशा प्रकारच्या लाकडाऊन मुळे जिल्ह्यातील व्यापार्यांचे, मजुरांचे, कामगारांचे, तसेच सर्वसामान्य लोकांचे अतोनात हाल झाले.
जिल्हाधिकारी गडचिरोली यांचा या निर्णयामुळे दुकानांमध्ये काम करणारे नौकर,कामगार, मजूर, लहान-मोठे दुकानदार यांनाही याचा मोठा फटका बसणार असून त्यांच्यावर उपासमारीची पाळी येणार आहे. त्यामुळे किमान या बाबींचा विचार करून सोमवार ते शुक्रवार अत्यावश्यक सेवा सोबतच बाजारपेठ सुरू ठेवण्या बाबत सुधारित आदेश माननीय जिल्हाधिकारी यांनी काढावेत अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केली आहे.