आमदार कृष्णा गजबे यांच्या पुढाकारात जिल्ह्यात सुरू असलेले लॉकडाऊन शिथिल करण्यासाठी गडचिरोली जिल्हा व्यापारी संघटनेचे पालकमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांना साकडे.
गडचिरोली:- जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे जिल्ह्यात सुरू असलेल्या विकास कामांचा व कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री एकनाथजी शिंदे यांचे आगमन झाले असता आमदार कृष्णा गजबे यांच्या पुढाकारात जिल्ह्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे व्यापा-यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असुन सर्व व्यापारी कोरोना नियमावलीचे काटेकोरपणे पालन करत व्यापार करण्यास तयार आहेत. त्यामुळे नियमात सुधारणा करून लॉकडाऊन शिथिल करण्याची गडचिरोली जिल्हा व्यापारी संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आली. सदर मागणीवर आठवड्याभरात जिल्ह्यात कोरोना परिस्थितीवर लॉकडाऊनच्या परिणामकारतेचा आढावा घेऊन स्थानिक परिस्थितीनुसार लॉकडाऊन शिथील करण्यात येईल असे मा पालकमंत्री महोदयांनी आश्वस्त केले. याप्रसंगी आमदार कृष्णा गजबे यांच्या सह श्री दिलीप सारडा, श्री संतु शामदासानी, श्री पंकज खरवडे हे व देसाईगंज, आरमोरी व जिल्ह्यातील अन्य व्यापारी उपस्थित होते.