ग्रामीण भागातील विवाह समारंभावर आता प्रशासनाची करडी नजर.

1379

ग्रामीण भागातील विवाह समारंभावर आता प्रशासनाची करडी नजर.

विवाहासमारंभात 25 पेक्षा जास्त जणांची उपस्थिती राहिल्यास वर वधू पक्षावर गुन्हा तर तलाठी व ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई

गडचिरोली –
कोरोनाचा वाढता प्रसार बघता सरकारने 15 एप्रिल ते 1 मे पर्यंत कडक निर्बंधासह लाकडाऊन घोषणा केली.विशेष म्हणजे लग्नसमारंभात होणाऱ्या गर्दीपासून कोरोना विषाणूचा प्रसार मोठया प्रमाणावर होतो हे लक्षात घेऊन सरकारने विवाह समारंभात केवळ 25 जण उपस्थित राहू शकतील असा आदेश काढला. असे असले तरी सदर नियमांचे पालन केवळ शहरी भागातच होताना दिसून येते.ग्रामीण भागात मात्र या नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसते.लग्नसमारंभात खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते.यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने विवाह समारंभात 25 पेक्षा जास्त जणांची उपस्थिती राहिल्यास वर, वधू पक्ष,कॅटरस,मंगल कार्यालय यांच्यावर तर गुन्हा दाखल करणारच परंतु ग्रामीण भागात मात्र यासाठी तलाठी व ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. असा आदेश काढला.यामुळे आता तलाठी व ग्रामसेवक सतर्क झाले असून आता गावातल्या विवाह समारंभावर त्यांची करडी नजर राहणार आहे.