राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत गहू व तांदूळाचे नियतन व वाटप

94

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत गहू व तांदूळाचे नियतन व वाटप

गडचिरोली,(जिमाका)दि.17 :- गडचिरोली जिल्ह्यातील सर्व रेशनकार्डधारकांना सुचित करण्यात येते की, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत माहे एप्रिल, मे व जुन 2021 करीता अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंबातील पात्र लाभार्थ्यांना गहू व तांदूळाचे नियतन व वाटप परिमाण निश्चित करण्यात आलेले आहे.
अंत्योदय अन्न योजना अंतर्गत प्रती शिधापत्रिका 25 किलो तांदुळ 3 रुपये प्रती किलो प्रमाणे, 10 किलो गहू 2 रुपये प्रती किलो, 1 किलो साखर 20 रुपये प्रती किलो प्रमाणे. तर प्राधान्य कुटूंब लाभार्थी यांना 3 किलो तांदुळ व 2 किलो गहू अनुक्रमे रुपये 3 व रुपये 2 किलो प्रमाणे.
शासनाकडून मंजूर नियतन (क्विंटल मध्ये) पुढील प्रमाणे आहे. अंत्योदय अन्न योजना अंतर्गत एप्रिल मध्ये तांदुळ 25480 , गहू 10190, साखर 1006 तर माहे मे मध्ये तांदुळ 25480 , गहू 10190, साखर 1006 व जून मध्ये तांदूळ 25480 , गहू 10190, साखर 1006 असा असेल तर प्राधान्य कुटूंब लाभार्थीमध्ये माहे एप्रिल मध्ये तांदूळ 13370, गहू 8920, मे मध्ये तांदूळ 13370, गहू 8920, व जून मध्ये तांदूळ 13370, गहू 8920 असा असेल.
तर मासिक केरोसीन निर्धारित वाटप परिमाण हे त्याकरीता गॅस नसल्याचे हमीपत्र सादर केलेल्या शिधापत्रिका धारकांसाठी असेल. त्यानुसार शिधापत्रिकावरील 1 व्यक्तीची संख्या असल्यास दोन लिटर अनुज्ञेय असेल. दोन व्यक्ती असल्यास तीन लिटर तर तीन व्यक्ती वा त्याहून अधिक व्यक्ती असल्यास चार लिटर अनुज्ञेय असेल.
नवसंजिवनी योजनेअंतर्गत पावसाळयात तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटण्याची दाट शक्यता असणाऱ्या गावांकरीता पावसाळयापुर्वी धान्य पुरवठा करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने माहे मे,2021 च्या प्राप्त नियतनामधून माहे जून ते सप्टेंबर 2021 या महिन्यांकरीता सदर योजनेअंतर्गत धानोरा, मुलचेरा, अहेरी, सिरोंचा, एटापल्ली,व भामरागड या 6 तालुक्यातील 127 रास्तभाव दुकानदारांचे मार्फतीने 263 गावांतील लाभार्थ्यांना पावसाळयापूर्वी धान्य पुरवठा करण्यात आला आहे. तरी सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना सुचित करण्यात येते की, त्यांना नेमून दिलेल्या स्वस्त धान्य दुकानात जावून आपले शिधापत्रिकेवर देय असलेल्या संपूर्ण अन्नधान्याची उचल करावी. धान्य घेतेवेळी POS मशीन मधून निघणारे बिल घेवून, बिल पावतीवर नमूद असलेली रक्कम देण्यात यावी. दुकानात एकाच वेळी गर्दी न करता सामाजिक अंतराचे पालन करावे असे जिल्हा पुरवठा अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.